Gold Silver Rate: सोन्याच्या दरात पुन्हा 'वाढ' सोन्याचा दर १००७५० प्रति तोळा चांदीत स्थिरता कायम 'हे' कारण जबाबदार!

प्रतिनिधी: सोन्याचांदीच्या दरात काल झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात कुठलाही बदल झाला नाही. आज सकाळपर्यंत सोन्याच्या दरात 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याच्या दरात २७ रुपयांनी वाढ झालेली असल्याने प्रति ग्रॅम किंमत १००७५ रूपयांवर पोहोचली आहे. २४ कॅरेट प्रति तोळा किंमत २७० रुपयाने वाढत १००७५० रूपयांवर गेली आहे.याखेरीज २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम किंमत २५ रुपयांनी वाढत ९२३५ रुपयांना तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत २५० रुपयांनी वाढत ९२३५० रूपये गेली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत २० रुपयाने वाढत ७५५६ रूपये झाली. तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत २०० रूपयांनी वाढत ७५५६० रूपयांवर पोहोचली आहे.


एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मधील सोन्याच्या निर्देशांकात ०.०१% घसरण झाली होती त्यामुळे एमसी एक्स गोल्ड पातळी ९९०९६ रुपयांवर आहे. तसेच जागतिक पातळीवर सोन्याच्या निर्देशांकात घसरण पहायला मिळत आहे. गोल्ड फ्युचर (Gold Future) मध्ये ०.६६% घसरण झाली आहे. काल युएस गोल्ड स्पॉट (Gold Spot Index) यामध्ये ०.०७% घसरण झाली होती.


एकूण जागतिक पातळीवर इस्त्राईल व इराण यांच्यातील युद्धामुळे मंदीची लाट येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होते. सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढल्याने यापूर्वी किंमत पातळी उच्चांक होती. मात्र सोनाच्या वाढत्या दरामुळे लोकांनी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कानाडोळा केल्याने पुरवठ्यापेक्षा मागणी घटली दुसरीकडे आरबीआयच्या नुकत्याच प्रोजेक्ट फायनांसिंग घोषणेनंतर लोकांची गुंतवणूक रिअल इस्टेट क्षेत्रात अधिक होऊ शकते. युएस फेडरल रिझ र्व्ह व्याजदरात कपात न झाल्याने व मध्यपूर्वेकडील अमेरिकचा बाजारात कल मोठ्या अंकाने बाजार कोसळला होता व डॉलरच्या तुलनेत रुपयाची १६ पैशांची घसरण झाल्यानंतर बाजारात सोन्याचे दर नियंत्रित राहण्यास मदत झाली होती.


मात्र आज पुन्हा कच्च्या तेलाच्याबरोबरच अमेरिकन बाजारातील घसरणीनंतर बाजारात अस्थिरता कायम राहिली आहे. विशेषतः फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी आगामी काळात टेरिफ व इतर कारणांमुळे महागाईत वाढ होऊ शकते असे म्हटले होते. त्यानंतर वाढती बेरोजगारी व महागाई येऊ शकते या भाकीतानंतर गुंतवणूकदारांनी सावधतेचा पवित्रा घेतला होता. व आता सोन्यातील गुंतवणूक वाढण्याची पुन्हा एकदा शक्यता वर्तवली जात आहे.बाजारातील अस्थिरता आणि भू-राजकीय चिंता यांच्यात, तज्ञांचा असा विश्वास आहे की सोने आणि चांदी ही सुरक्षित गुंतवणूक आहे; तथापि, त्यांचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये धोरणात्मकपणे समावेश केला पाहिजे.


चांदीत कुठलाही बदल नाही!


आज चांदीच्या किंमतीत कुठलाही बदल न झाल्याने किंमती स्थिर राहिल्या आहेत. १ ग्रॅम चांदीची किंमत ११० रूपये रूपये व एक किलो चांदीचे दर ११००० रूपयांवर कायम आहेत.तर काल चांदीची प्रति ग्रॅम किंमत १०६५७ रूपये होती.एम सीएक्सवर चांदीच्या दरात ०.०५% किरकोळ वाढ झाल्याने एमसीएक्सवरील चांदीचा निर्देशांक १०६२७५.०० पातळीवर पोहोचला आहे. काल सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. २४ कॅरेट सोन्याची प्रति तोळा किंमत १००४८० रूपयां वर व २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ९२१०० होती.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची