देवेंद्रजी योगा करतात का ? पत्रकारांच्या प्रश्नांवर अमृता फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया...

मुंबई : आज आंतराराष्ट्रीय योगा दिवस असल्याने संपूर्ण राज्यातील शाळा, कॉलेज, शासकीय संस्थासोबतचं खाजगी संस्थांमध्ये देखील योगा अभ्यासाचं आयोजन करण्यात आले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दर्जेवर योगाचे महत्व समजून सांगितल्यामुळे योग दिवस साजरा केला जातो. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात योगा अभ्यास केला, तर अमृता फडणवीसांनी मुंबतील सफाई कामगारांसाठी योगा शिबिरामध्ये सहभाग घेतला.  यावेळी मुंबईत भूषण गगराणी, अर्जून कपूर, यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.  मुंबई महानगरपालिकेच्या वतीने योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

काही पत्रकारांनी योगा दिनानिमित्त अमृत फडणवीस यांची प्रतिक्रिया घेतली, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आजकाल खूपच संयमी आहेत. त्याचं कारण योगा आहे का? पत्रकारांच्या प्रश्नांवर अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस योगीच आहेत,त्यांना जेव्हा  वेळ मिळतो तेव्हा ध्यानधारणा करत असतात, ते कसरत करत नाहीत. फक्त आजच्या दिवशी आपण सर्वांनी योगा न करता, नियमीत योगासने करावेत त्यामुळे शारिरीक आणि मानिसक आरोग्य चांगले राहते. मोदीजींनी या दिवसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आहे. असे अमृता फडणवीस म्हणाल्या...

तसेच पुण्यात योग दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. योग आपली परंपरा आणि संस्कृती आहे. तसेच योग ही आनंदायी जीवनाची गुरुकिल्ली देखील आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. मोदींच्या प्रस्तावाला संपूर्ण जगाने पाठिंबा दिला. त्यामुळे योग दिना दिवशीचं योगासने न करता नियमीत योगा करावा असे आवाहन फडणवीस यांनी केले.

 

 







 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व