Direct Tax Collection - प्रत्यक्ष कर संकलनात रेकॉर्डब्रेक वाढ Collection पोहोचले 'इतक्या' लाख कोटीवर

प्रतिनिधी: देशात सातत्याने करभरणा वाढत असल्याचे चित्र वेळोवेळी स्पष्ट झाले होते. त्यातील पुढील अध्याय म्हणून आयकर विभागाने (Income Tax Department) ने कर भरणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. भारताच्या प्रत्यक्ष स्थूल कर संकलन (Gross Direct Tax Collection) यामध्ये इयर ऑन इयर बेसिस (YoY) ४.८६% इतकी विक्रमी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील प्रत्यक्ष कर संकलन ५.४५ लाख कोटींवर पोहोचले आहे जे मागील वर्षाच्या जूनमध्ये ५.१९ लाख कोटींवर होते.

मात्र निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात (Net Direct Collection Tax) यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या १.३९% घसरण झाली आहे. घट झाल्यावर निव्वळ संकलन ४.५९ लाख कोटींवर पोहोचले आहे. प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, यातील ही घट प्रामुख्याने कर परतावा (Tax Refund) दिल्यामुळे झाला होता. यावर्षी आगाऊ करभरणी (Advance Tax Collection)१.५६ लाख कोटीवर आहे. मागच्या वर्षीपेक्षा या आगाऊ भरणीत इयर ऑन इयर बेसिसवर ३.८७% वाढ झाली आहे.कर परताव्यात ५८.०४% वाढ झाली, जी गेल्या वर्षी ५४,६६१ कोटी रुपयांवरून ८६,३८५ कोटी रुपयांवर पोहोचली. परताव्यात ही वाढ कदाचित सुधारित करदात्यांच्या सेवा आणि जलद प्रक्रियेमुळे होत आहे.असे असताना वाढलेल्या परताव्यामुळे ही घट दर्शविली गेली आहे.

दिलेल्या माहितीनुसार,औद्योगिक कर (Corporate Taxes) यामध्ये वाढ वेगवान होत असल्याचे दिसून आले. तर सिक्युरिटीज ट्रान्सकशन टॅक्स (Security Transaction Tax STT) मध्ये म्हणजेच बाजारातील व्यवहारावर आकारला जा णार टॅक्स यामध्ये घट झालेली आहे.मध्यंतरीच इन्कमटॅक्स विभागाने E Pay Tax ही परियोजना आणली होती ज्यामध्ये सुरळीतपणे ऑनलाईन कर भरण्याची सुविधा होती. जुलै २०२४ मध्ये सरकारने आयकर कायदा १९६१ यांची नव्याने चि कित्सा सुरू केली होती. या कायद्याअंतर्गत असलेले अडथळे व अडचणी दूर करण्यासाठी घेतलेले हे मोठे पाऊल होते.

यापूर्वी देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुष्टी केली होती की नवीन प्राप्तिकर विधेयक संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी मांडले जाईल. आधी जाहीर केल्याप्रमाणे, सुधारित करप्रणालीनुसार वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर शून्य करदायित्व असेल, त्यानंतर सवलत मर्यादा ६०,००० रुपये करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

मिशोचे गुंतवणूक मालामाल! शेअर बाजारात दमदार पदार्पण थेट प्रति शेअर ४६.४% प्रिमियम दरासह बाजारात सूचीबद्ध

मोहित सोमण: मिशोचे (Meesho Limited IPO) आज शेअर बाजारात दमदार पदार्पण झाले आहे. मिशोचा शेअर बाजारात ४६.४% प्रति शेअर प्रिमियमसह

सिंधुदेशाच्या मागणीवरून वातावरण तापलं, पाकिस्तानची फाळणी होणार ?

इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या

 शेअर बाजारात उत्साहला विशेष 'ऊत' फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होणार? सेन्सेक्स १०९.४५,निफ्टी २६.९५ अंकाने उसळला

मोहित सोमण: थोड्याच वेळात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीबाबत घोषणा होत असताना बाजारात उत्साहाचे वातावरण

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही