All Is Well Movie : ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात!

मुंबई : मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. बेळगावकर असलेल्या निर्माते अमोद मुचंडीकर,वाणी हालप्पनवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी असून ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट मनोरंजनाची अफलातून ट्रीट असणार आहे असा विश्वास निर्माते अमोद मुचंडीकर यांनी व्यक्त केला.



आनंद, राग, मनातील गुपितं व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं हा आशय अधोरेखित करणाऱ्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटातून प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. या तिघांसोबत चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. मैत्रीसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या या तीन मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की, त्यांच्या आयुष्यात खळबळ उडते. मात्र न डगमगता हे तीनही मित्र परिस्थितीला सामोरे जात एकत्र उभे ठाकतात. आपल्यातील मैत्री जपत फसवणुकीचा हे तीन मित्र कसा निकाल लावतात? याची धमाल दिग्दर्शक योगेश जाधव यांनी ‘ऑल इज वेल’ चित्रपटामधून दाखविली आहे.


‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. तरुणाईची कथा असलेला ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट कलाकारांचा सुरेख अभिनय, सुमधूर संगीत आणि नेत्रसुखद सादरीकरणाने सजला आहे.

Comments
Add Comment

'फुला'तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा

मुंबई : अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी 'फुला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला

अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र; ‘रामजी आके भला करेंगे’ टीझरमध्ये पीक कॉमेडीची झलक

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज मुंबई : भूत बंगला हा २०२६ मधील

लंडन फॅशन वीक २०२६ मध्ये क्रिती सॅनन हिने उधळला ग्लॅमर

लंडन : बॉलिवूडमधील आघाडीची स्टाइल आयकॉन Kriti Sanon हिने पुन्हा एकदा लंडन फॅशन वीकमध्ये आपल्या शानदार उपस्थितीने

अल्लू अर्जुन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘AA22xA6’मध्ये नवी जोडी ठरली चर्चेचा विषय

मुंबई : भारतीय सिनेमात पहिल्यांदाच असा काहीतरी मोठा धमाका घडणार आहे, जो खऱ्या अर्थाने भव्य ठरणार आहे. दीपिका

ऐन रिलीजच्या तोंडावर केरळ स्टोरी २ सिनेमात सेन्सॉर बोर्डाने सुनावले चक्क १६ बदल

मुंबई : लव्ह जिहाद या मुद्द्यावर आधारित असलेला केरळ स्टोरी या सिनेमाचा दुसरा भाग येत्या शुक्रवारी २७

Sonalee Kulkarni Brother Death: सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन; अभिनेत्रीची भावूक पोस्ट, म्हणाली...

मुंबई: मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली