पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

भात रोपांची पेरणी लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला


पालघर : पालघर जिल्ह्यात १६ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ व २२ जून रोजी पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी उघडीपही राहू शकते. २३ जूननंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. २४ ते २६ जून दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


तसेच, २७ जून ते ३ जुलै या कालावधीत देखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. ही माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली आहे. या कालावधीत किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर राहील. वाऱ्याचा वेग २३ ते २५ जूनदरम्यान २० किमी प्रतितास इतका वाढण्याची शक्यता असून, त्याचा फळबागांवर परिणाम होऊ शकतो.


या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. दि. २१ आणि २२ जून रोजी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता असल्याने भात रोपवाटीकेची पेरणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी केले आहे.


गादी वाफ्यावर भात पेरणी करताना चारही बाजूंनी खोल चर काढावेत जेणेकरून जास्त पावसातही पाण्याचा निचरा होईल आणि कोवळी रोपे सडण्याचे प्रमाण कमी राहील. नुकतीच लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार देऊन बांधणी करावी व मातीची भर टाकावी. निचऱ्याची व्यवस्था करून ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील