International Yoga Day 2025: विशाखापट्टणमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत रचला जाणार विश्वविक्रम, आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी

विशाखापट्टणम: जगभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2025)  साजरा केला जाणार आहे. योगाभ्यासाचे महत्त्व, आणि त्याचे फायदे जगाला कळण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जातो. त्यामुळे भारतातही अनेक ठिकाणी योगासनाचे कार्यक्रम आणि शिबिर आयोजन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत नवा विश्वविक्रम रचला जाणार आहे. त्यासाठी पाच लाख लोक योगदिनात सहभाग घेणार असल्याचे म्हंटले जात आहे.

योगदिनाच्या निमित्ताने विश्वविक्रम करण्याकरिता विशाखापट्टणम समुद्रकिनाऱ्यावर मोठी तयारी करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी विक्रमी पाच लाख लोक योग करू शकतील यासाठी आवश्यक अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.

योगादिनाच्या विश्वविक्रमासाठी जय्यत तयारी


विशाखापट्टणम येथील आरके बीच ते भिमिली पर्यंत २६ किमी रस्त्यावर बॅरिकेड्स, मॅट्स, इलेक्ट्रिक लाईट्स, एलईडी स्क्रीन आणि प्रशिक्षकांसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. पाऊस पडल्यास योगदिनाचा कार्यक्रम बंद पडू नये, याकरिता आंध्र विद्यापीठात पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, चंद्राबाबू नायडू सरकारच्या वतीनं राज्य स्तरावर आयोजित विविध वयोगटातील स्पर्धांमधील १७९ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. ते सर्व आरके बीचवरील योग महोत्सवात विविध आसने करून सादरीकरण करणार आहेत.

असा आहे योगदिनाचा कार्यक्रम


पंतप्रधान मोदी शुक्रवारी संध्याकाळी ६.४० वाजता विशेष विमानानं विशाखापट्टणमला पोहोचणार आहेत. स्वागत समारंभानंतर ते संध्याकाळी ६.४५ वाजता ईस्टर्न नेव्हल कमांड ऑफिसर्स मेस गेस्ट हाऊसमध्ये जाणार आहेत. पंतप्रधान तिथे रात्रीचा मुक्काम करणार आहेत. शनिवारी (२१ जून) पंतप्रधान सकाळी ६ वाजता रस्तेमार्गे आरके बीचला रवाना होऊन सायंकाळी ६.२५ वाजता पोहोचतील. योग समारंभानंतर ते संध्याकाळी ७.५० वाजता निघतील. पंतप्रधान दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता हेलिकॉप्टरने परत येतील. सकाळी ११.४५ वाजता आयएनएस देगा येथे पोहोचतील. पंतप्रधान मोदी सकाळी ११.५० वाजता दिल्लीला रवाना होतील.२१ तारखेला सकाळी ६.२५ वाजता योग-२०२५ कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. पंतप्रधान मोदी १५ मिनिटे भाषण करतील. सकाळी ७ वाजता आसन सुरू होतील आणि संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत चालतील.

२०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार संयुक्त राष्ट्रानं २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याला मान्यता दिली आहे.
Comments
Add Comment

छत्तीसगडमधील सुकमात चकमक, तीन नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या

तीन दिवसांत 28 काळवीटांचा मृत्यू; कर्नाटक प्राणीसंग्रहालयावर संशयाचे सावट

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर राणी चेन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळवीटांचा

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०