ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे ठप्प ; गुजरात मधून येणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या...

पालघर : मुंबईकडून अजमेरच्या दिशेने जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेस (Ajmer Express Train) पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये दोष झाल्याचे निष्पन्न होऊन विद्युत तारा तुडल्याच्या निदर्शनास आले, त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच मुंबईतून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवून दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुरुस्तीच्या कामासाठी काही अवधी जाऊ शकतो अशी शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

रेल्वेचा तांत्रिक बिघाड साधारणपणे ७:30 च्या सुमारास झाला आहे अशी माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली. रेल्वे प्रशासनाने सर्तकता दाखवत सायरन वाजून लोकांना अलर्ट केल्याने लोकांनमध्ये भीतीचं वातावरण आहे. अजमेर ट्रेन गुजरातकडे जाणारी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर एक नंबर व दोन नंबर ट्रॅक क्रॉस करत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुडली. या घटनेमुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली. पाऊस सुरु असल्यामुळे  खबरदारी म्हणून रेल्वे  प्रवाशांनी ट्रॅक वरुन उतरणे किंवा चालणे टाळावे. अशा सुचना रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आहेत.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण