कुर्ला, पवई आणि विक्रोळीत सोमवारी पाणीकपात

रविवारपासूनच पाण्याचा वापर जपून करा


मुंबई (खास प्रतिनिधी): पवई जलाशयाच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम मुंबई महानगरपालिकेने सुरू केले आहे. या अंतर्गत कप्पा क्रमांक २ चे संरचनात्मक दुरूस्ती काम पूर्ण झाले आहे. आता कप्पा क्रमांक १ च्या संरचनात्मक दुरूस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या संरचनात्मक दुरूस्ती केलेल्या पवई निम्नस्तर जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ मधून सोमवारी २३ जून २०२५ पासून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने खबरदारीचा


उपाय म्हणून सोमवारी २३ जून २०२५ नंतर पुढील ३ ते ४ दिवस 'एल' विभागातील कुर्ला परिसर व 'एस' विभागातील पवई, विक्रोळी भागातील नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून गाळून प्यावे आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



या भागांत होणार पाणीकपातीचा परिणाम


'एल' विभाग : पाणीपुरवठा कुर्ला उत्तर परिक्षेत्र
बरेली मशीद, ९० फुटी मार्ग कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर-अंधेरी जोडरस्ता (लिंक रोड), सावरकर मार्ग, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवाह उद्योग मार्ग, सत्यनगर पाईपलाईन मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.०० ते दुपारी २.०० वा.)



'एल' विभाग : पाणीपुरवठा कुर्ला दक्षिण परिक्षेत्र


काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरानगर, संगम वसाहत, शास्त्रीनगर, घास कंपाऊंड, ख्रिश्चन गांव, मसरानी गल्ली, गाझी मिया दर्गा मार्ग, ए. एच. वाडिया मार्ग, वाडिया इस्टेट, एम. एन. मार्ग, बैलबाजार, संदेश नगर, क्रांती नगर, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्ग, कमानी, कल्पना सिनेमागृह, किस्मत नगर, गफूर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू गील मार्ग, रामदास चौक, ईगलवाडी, आण्णासागर मार्ग, ब्राह्मण वाडी, पटेल वाडी, स. गो. बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, एल. आय. जी. एन. आय. जी. कॉलनी, विनोबा भावे नगर, एच. डी. आय. एल. संपूर्ण संकुल, नौपाडा, प्रीमिअर वसाहत, सुंदरबाग, शिव टेकडी, संजय नगर, कपाडिया नगर, रुपा नगर, तकिया विभाग, मॅच फॅक्टरी गल्ली, शिवाजी कुटीर गल्ली, टॅक्सीमन वसाहत, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्ग, चाफे गल्ली चुनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर, जरीमरी माता मंदीर परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.३० ते सकाळी ८.५० वा.)



'एस' विभाग पाणीपुरवठा कुर्ला दक्षिण परिक्षेत्र


मोरारजी नगर, भीमनगर, पासपोली गावठाण, लोकविहार वसाहत, रेनेसेन्स हॉटेल परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायकाळी ६.३० ते सकाळी ८.५० वा.).

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध