Woman Fight in Local: बापरे! महिलांच्या डब्यात फ्रीस्टाइल हाणामारी; डोकं फुटेपर्यंत मारलं

मुंबई: लोकल ट्रेनमध्ये जागेवरून वाद हा नेहमीचाच! त्यात महिला डब्यात तर असे प्रकार रोजच होत असतात, पण जर हा वाद विकोपाला गेला तर त्याची चर्चा ही होतेच. ज्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर  प्रचंड व्हायरल होतात, लोकल रेल्वे (Mumbai Local) मधील महिला डब्यातला असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला डब्यात जोरदार भांडण आणि मारहाण होताना पाहायला मिळते. कहर म्हणजे एक महिला रक्तबंबाळ झालेली देखील यात दिसून येते . ही घटना कोणत्या लोकलमधील आहे, आणि ती कधी घडली आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र कल्याण रेल्वे पोलिसांकडून व्हिडियोची चौकशी सुरू आहे.



घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल




या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Video Viral) चांगलाच व्हायरल होत असून, महिला एकमेकींना शिवीगाळ करताना , केस ओढताना आणि एकमेकांवर चापटा-बुक्क्यांचा वर्षाव करताना दिसून येतात. एकमेकांचे डोके फुटेपर्यंत रक्तबंबाळ होऊन हाणामारी करतानाचा हा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.  ही घटना नेमकी कोणत्या मार्गावरील लोकलमध्ये घडली हे स्पष्ट झालेलं नसून, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे किंवा हार्बर मार्ग यापैकी कुठल्यातरी मार्गावर ही गोंधळाची घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित महिलांमध्ये जागा मिळवण्यावरून वाद झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. काही प्रवाशांनी मात्र हा वाद वैयक्तिक कारणावरून झाला असावा, असंही म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या