शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात १०० कोटींचा घोटाळा

जालना : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने अनुदान वाटप प्रक्रिया सुरू केली. या अनुदानाच्या वाटपात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी हा घोटाळा उघड केला. अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी दोषी आढळलेल्या २१ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. घोटाळा प्रकरणी SIT अथवा CBI मार्फत सखोल तपास करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे.

जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडले होते. शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ४१२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. या अनुदानाचे वाटप करतेवेळी १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला. काही अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे दाखवून अनुदान लाटले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार ३४.९७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. पण भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. अंबड, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये हा घोटाळा झाला. यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश आहे, असा आरोप भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. जालना येथे जिल्हा नियोजन समितीची १४ जून २०२५ रोजी बैठक झाली. या बैठकीत पहिल्यांदाच भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला.

घोटाळा प्रकरणी कारवाई झालेल्या २१ अधिकाऱ्यांमध्ये १० तलाठी आणि ११ इतर अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीने अंबड आणि घनसावंगीतील ८० गावांची फेरतपासणी केली. यात ७४ कर्मचारी दोषी आढळले आहेत. आणखी १५ जणांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. काम करत असलेल्या पाच तहसीलदार आणि पाच नायब तहसीलदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत पाच कोटी ७४ लाख रुपये वसूल केले आहेत. इतर वसुलीसाठी अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे. एकूण दोन लाख ५७ हजार २९७ शेतकऱ्यांपैकी एक लाख ९४ हजार ११३ जणांना अनुदान मिळाले आहे. तर ६३ हजार १८४ शेतकऱ्यांचे अनुदान आणि १५ हजार ३१ जणांचे ई-केवायसी (e-KYC) प्रलंबित आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षांतील अनुदान वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक

Devendra Fadnavis : पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या महिनाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू मुंबई : "

Jalgaon : जळगावच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ? शहरातील चार ठिकाणी उड्डाणपूल आणि अंडरपास प्रस्तावाला नितीन गडकरींचा हिरवा कंदील

Jalgaon : जळगावकरांसाठी वाहतुकीबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीवर

Sunetra Pawar : आदिवासी हा विकासाचा लाभार्थी नव्हे, तर विकासाला दिशा देणारा समाज!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; ग्लोबल वॉर्मिगबाबतचा जीवनमंत्र आदिवासींनी शेकडो वर्षांपूर्वी दिला मुंबई :