शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात १०० कोटींचा घोटाळा

जालना : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने अनुदान वाटप प्रक्रिया सुरू केली. या अनुदानाच्या वाटपात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी हा घोटाळा उघड केला. अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी दोषी आढळलेल्या २१ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. घोटाळा प्रकरणी SIT अथवा CBI मार्फत सखोल तपास करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे.

जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडले होते. शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ४१२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. या अनुदानाचे वाटप करतेवेळी १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला. काही अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे दाखवून अनुदान लाटले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार ३४.९७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. पण भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. अंबड, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये हा घोटाळा झाला. यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश आहे, असा आरोप भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. जालना येथे जिल्हा नियोजन समितीची १४ जून २०२५ रोजी बैठक झाली. या बैठकीत पहिल्यांदाच भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला.

घोटाळा प्रकरणी कारवाई झालेल्या २१ अधिकाऱ्यांमध्ये १० तलाठी आणि ११ इतर अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीने अंबड आणि घनसावंगीतील ८० गावांची फेरतपासणी केली. यात ७४ कर्मचारी दोषी आढळले आहेत. आणखी १५ जणांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. काम करत असलेल्या पाच तहसीलदार आणि पाच नायब तहसीलदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत पाच कोटी ७४ लाख रुपये वसूल केले आहेत. इतर वसुलीसाठी अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे. एकूण दोन लाख ५७ हजार २९७ शेतकऱ्यांपैकी एक लाख ९४ हजार ११३ जणांना अनुदान मिळाले आहे. तर ६३ हजार १८४ शेतकऱ्यांचे अनुदान आणि १५ हजार ३१ जणांचे ई-केवायसी (e-KYC) प्रलंबित आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षांतील अनुदान वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत