Pratap Sarnaik : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रुग्णालयात

ठाणे : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ताप आला आणि अंगदुखीचा त्रास वाढला. यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजारी असल्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर बुधवारपासूनच उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी प्रताप सरनाईक यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कमंत्री म्हणून कार्यरत आहेत. तब्येत बिघडल्यामुळे बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तापामुळे प्रताप सरनाईक यांना अशक्तपणा जाणवत आहे. पण त्यांच्या कोरोना, डेंग्यू आणि टायफॉइडच्या आतापर्यंत केलेल्या चाचण्या नकारात्मक आल्या. सरनाईक यांना कोरोना, डेंग्यू, टायफॉइड झालेला नाही, असे चाचणीचे अहवाल बघून डॉक्टरांकडून सांगण्यात आले. उपचार सुरू आहेत आणि प्रताप सरनाईक विश्रांती घेत आहेत. लवकरच त्यांच्या तब्येतीला आराम पडेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
Comments
Add Comment

National Handloom Day : रेखा ते आलिया भट्ट! 'राष्ट्रीय हातमाग दिना'निमित्त बॉलिवूडच्या 'या' ६ सौंदर्यवतींनी जपली भारतीय विणकाम परंपरा

मुंबई : धाग्या-धाग्यांमध्ये गुंतलेली संस्कृती आणि हातांनी साकारलेली अद्भूत कलाकुसर म्हणजेच भारताची पारंपरिक

Deool Band 2 post goes viral : 'देऊळ बंद 2' चित्रपटगृहातून काढण्याचा मोठा निर्णय; दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस

Mini Mathur Wins Alliance : ‘अलायन्स’च्या रणांगणात मिनी माथुरचा विजय! ५० लाखांच्या बक्षिसासह पहिल्या पर्वाची ट्रॉफी केली नावावर

मुंबई : लोकप्रिय रिअॅलिटी शो अलायन्स ‘Alliance’ च्या पहिल्या पर्वाचा विजेता अखेर जाहीर झाला असून, अभिनेत्री आणि होस्ट

Nashik : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकला वाहतूक नियोजनावर भर, भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज

Nashik : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

Sindhudurg News : देवगडच्या कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाहून मृत्यू

सिंधुदुर्ग : कोकणात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत सावध करणारी आणि मन हेलावून

ONGC Russia Venezuela oil wells : कच्च्या तेलाच्या बाजारात भारताची मोठी झेप! व्हेनेझुएला अन् रशियातील तेल विहिरींवर आता ONGC चे वर्चस्व

नवी दिल्ली : जागतिक इंधन बाजारात आणि ऊर्जा क्षेत्रात भारताचा प्रभाव अधिक मजबूत करणारी एक अत्यंत महत्त्वाची