Nashik : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकला वाहतूक नियोजनावर भर, भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज

Nashik : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त नियोजन सुरू केले आहे. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार आणि उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.



भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज


श्रावण महिन्यात विशेषतः तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. मात्र, संपूर्ण महिनाभर शहरात भाविकांची वर्दळ कायम असल्याने सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, पथदिवे दुरुस्त करणे, धोकादायक विजेच्या तारा हटवणे, जुन्या इमारती आणि धोकादायक झाडांवर उपाययोजना करणे, तसेच शुद्ध पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



त्र्यंबकला वाहतूक नियोजनावर भर


दरम्यान, पोलिस प्रशासन, रिक्षा युनियन आणि स्थानिक गाइड यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक घेण्यात आली. श्रावण काळात वाहतूक कोंडी टाळणे, रिक्षा अधिकृत ठिकाणीच उभ्या करणे, तसेच भाविकांची फसवणूक किंवा गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज असून, सुरक्षित आणि सुकर दर्शनासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे