DNA : भारताची सर्वात मोठी डीएनए जुळवणी मोहीम!

  47

जीवन आणि मृत्यूचा लढा: डीएनए प्रोफाइलिंगची कहाणी


अहमदाबाद : अहमदाबाद - लंडन एअर इंडिया विमान अपघातानं संपूर्ण देश हादरला. या भीषण अपघातात २७४ हून अधिक जणांनी प्राण गमावले. मृतदेहांचे कोळसे झाले. मृतांची ओळख पटवणं हे मोठं आव्हान निर्माण झालं. मात्र या संकटात एक आशेचा किरण ठरले ते भारताचे फॉरेन्सिक तज्ज्ञ. भारतात आतापर्यंतची सर्वात मोठी DNA जुळवणी मोहीम यशस्वीपणे राबवली गेली. चला तर जाणून घेऊया या लेखातून अशक्यप्राय मिशनची कहाणी, जिथे विज्ञान, मेहनत आणि माणुसकी एकत्र आली.



अहमदाबाद विमान दुर्घटना भारताच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस. अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट AI १७१ चं विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच पडलं आणि आगीच्या ज्वाळांमध्ये लपटलं. एक हजार डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानामुळे प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवणं जवळपास अशक्य झालं. मात्र या संकटात भारताच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी एक चमत्कार घडवला. गांधीनगरच्या फॉरेन्सिक सायन्स डायरेक्टरेट आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या टीमने तातडीने कामाला सुरुवात केली. अपघातस्थळ सील करून ३०० हून अधिक नमुने गोळा केले. राजकोट, सुरत आणि वडोदऱ्याच्या फॉरेन्सिक लॅबमधून डीएनए मॅचिंग किट्स आणि उपकरणं आणली गेली. ४० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २०० कर्मचारी रात्रंदिवस हे मिशन यशस्वी करण्यासाठी धडपडत होते.



मृतांच्या नातेवाईकांचे २५० हून अधिक रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले. जळालेल्या हाडांमधून आणि ऊतींमधून डीएनए काढण्याचं आव्हानात्मक काम सुरू झालं. आरटी-पीसीआर आणि सिक्वेन्सिंगद्वारे तपशीलवार डीएनए प्रोफाइल्स तयार केली गेली. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अनुवांशिक घटकांची ओळख पटवली गेली. अपघातात मृतदेहांचे चेहरे, बोटांचे ठसे, दात नष्ट झालेले होते. डीएनए प्रोफाइलिंग हाच एकमेव विश्वसनीय पर्याय होता. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट होती, मात्र फॉरेन्सिक टीमने अवघ्या ३६ तासांत पहिल्या मृतदेहाची ओळख पटवली. अपघातानंतर अवघ्या सात दिवसांत २१० मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं. २०४ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. ज्यात ३० ब्रिटिश आणि ४ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. या मिशनमुळे भारताची फॉरेन्सिक क्षमता जगाने पाहिली आणि जागतिक पातळीवर चर्चा झाली.

डीएनए जुळवणं हे मिशन केवळ तांत्रिक यश नव्हतं, तर माणुसकीचा विजय होता. कमी वेळेत मृतदेहांची ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं. भावनिक आव्हानांना सामोरे जावं लागत होतं. या सर्व अडचणींवर मात करत फॉरेन्सिक टीमने अशक्य ते शक्य करून दाखवलं. संकट काळात भारताच्या सामर्थ्याची, विज्ञानाची आणि माणुसकीची 'एकी' दिसली. या डीएनए जुळवणी मोहिमेने भारत एकजुटीने आणि ताकदीने पुढे जातो, हे भारताने जगाला दाखवून दिलं.
Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या