भारताच्या हायपरसोनिक ग्लाईड क्षेपणास्त्राच्या चाचण्या प्रगतीपथावर

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारतीय सैन्याच्या प्रगत तंत्रज्ञानाची पाकिस्तान विरोधात यशस्वी चाचणी झाली. संपूर्ण जग या चाचणीचे साक्षीदार झाले. भारताने १०० तासांच्या हवाई युद्धात पाकिस्तानवर सरशी साधली. पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे नुकसान झाले. या कारवाईची जगाने दखल घेतली. पाठोपाठ डीआरडीओ विकसित करत असलेल्या भारताच्या हायपरसॉनिक ग्लाईड क्षेपणास्त्राबाबतचे वृत्त आले आहे. भारताच्या हायपरसॉनिक ग्लाईड क्षेपणास्त्राच्या चाचण्या प्रगतीपथावर आहेत. डीआरडीओने याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.



हायपरसोनिक म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा पाचपट जास्त वेग. या प्रचंड वेगाने उडण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रक्षेपित केल्यानंतर लक्ष्याचा मार्ग शोधत आवश्यकतेनुसार ग्लाईड करत स्वतःच्या मार्गात बदल करण्यास सक्षम आहे. भारत विकसित करत असलेले हायपरसोनिक ग्लाईड क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यास सोपे आहे. शत्रूच्या अनेक प्रकारच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भेदू शकते. भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची एक चाचणी काही महिन्यांपूर्वी घेतली आहे. क्षेपणास्त्रात आणखी बदल करुन ते अधिकाधिक प्रभावी आणि संहारक करण्याचे काम सुरू आहे.

भारताने हायपरसोनिक ग्लाईड क्षेपणास्त्रासाठी स्वदेशी इंजिन विकसित केले आहे. या इंजिनच्या मदतीने क्षेपणास्त्र वेगाने लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे. भारताने विकसित केलेले क्षेपणास्त्रासाठीचे इंजिन वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जात सलग एक हजार सेकंद कार्यरत राहते हे चाचणीतून सिद्ध झाले आहे. यामुळे क्षेपणास्त्र अधिक प्रभावी करण्यास मदत झाल्याचे डीआरडीओने सांगितले.

याआधी भारताने जमिनीवरुन आणि आकाशातून प्रक्षेपित करता येतील आणि जमिनीवरील तसेच आकाशातील लक्ष्य भेदू शकतील अशा प्रकारची ब्राह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्र विकसित केली आहेत. सुधारित आवृत्त्यांमुळे ब्राह्मोस हे क्रुझ क्षेपणास्त्र जमिनीखालून, जमिनीवरुन, पाण्याखालून, पाण्यावरुन आणि आकाशातून प्रक्षेपित करत जमिनीखाली, जमिनीवर, पाण्याखाली, पाण्यावर, आकाशात असलेले लक्ष्य पाठलाग करुन नष्ट करू शकते. सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते. भारताच्या इतर लढाऊ विमानांतूनही ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अस्त्र, अस्त्र मार्क २, अस्त्र मार्क ३, रुद्रम २, रुद्रम ३, रुद्रम ४, आधुनिक ड्रोन, टी-७२ अजय टँक आणि टी-९० भीष्म टँक आदी अनेक शस्त्रांची निर्मिती तसेच अनेक शस्त्रांच्या आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याचेही डीआरडीओने सांगितले.
Comments
Add Comment

भारताचा ‘ध्वनी’ ब्रह्मोसपेक्षाही महाभयंकर?

नवी दिल्ली : भारताने ब्रह्मोसपेक्षाही ‘महाभयंकर’ क्षेपणास्त्र तयार केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे नवे तळही थेट

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा