कोल्हापूरच्या स्मशानभूमीत भानामतीचा भयंकर प्रकार, सीसीटीव्ही फुटेजमुळे उडाली खळबळ 

  113

कोल्हापुर: राज्यातील जयसिंगपूरमधील उदगाव वैकुंठधाम स्मानभूमीत दिवसाढवळ्या भानामतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. झाले असे की, या स्मशानभूमीत एका पुरुष आणि महिलेने नग्न होऊन अघोरी पूजा केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले आहे.


पुरोगामी वारसा असलेल्या कोल्हापूरात आता एका स्मशानभूमीत भानामतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत एका पुरुष आणि महिलेने नग्न होऊन अघोरी पूजा केल्याचे सीसीटीव्हीतून उघड झाले आहे.



सीसीटीव्ही फुटेजद्वारे प्रकार आला उघडकीस


 जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. तेव्हा मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केला असल्याचा उघड झाल्याने नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर ग्रामपंचायतीने सीसीटीव्हीची तपासणी केली असता हा खतरनाक प्रकार उघडकीस आला.



भरदिवसा नग्न होवून अघोरी पूजा


सीसीटीव्हीची तपासणी केली असता या सीसीटीव्हीमध्ये महिला, पुरुष वेगवेगळ्यावेळी विशेषत: अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार अशा दिवशी भरदिवसा नग्न होवून अघोरी पूजा करीत असल्याचे समोर आले आहे. सातत्याने होत असलेल्या या करनी भानामतीच्या प्रकारामुळे उदगाव, जयसिंगपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पुरोगामी राज्य असलेल्या या कोल्हापूरमध्ये अंधश्रद्धेचा हा अघोरी प्रकार उघड झाल्यामुळे, ग्रामपंचायतीने कडक पाऊल उचलण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे वैकुंठधामाची जबाबदारी घेऊन, सदर ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू

वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक