पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोचे नवे स्थानक उद्यापासून सुरु....

 पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुण्यातील प्रवाशांसाठी मेट्रोचे नवे स्थानक खडकी उद्यापासून सुरु होणार आहे. हे नवीन स्थानक २१ जून रोजी प्रवासी सेवेत दाखल होणार आहे.  खडकी रेल्वे स्टेशनच्या जवळचं मेट्रो स्थानक असल्याने प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे. अनेक महिन्यांपूर्वीच मेट्रो खडकी स्थानकाचे काम झाले होते. यापूर्वी ही प्रवाशांनी खडकी मेट्रो स्थानक लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पुणेकरांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव घेता येईल. हे स्थानक सुरु झाल्यामुळे प्रवाशांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अश्या महत्वाच्या ठिकाणी पोहचणे सोयीस्कर होणार आहे.

पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी माध्यमांना माहिती देताना म्हणाले, पुण्यातील प्रवाशांनी खडकी रेल्वे स्थानक कधी सुरु होणार आहे, अशी वारंवार विचारणा केली होती. मुळातच, खडकी मेट्रो स्थानक उद्या सुरु झाल्यानंतर कामानिमित्त जाणाऱ्या लोकांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता या ठिकाणी प्रवासासाठी खडकी स्थानकाचा फायदा होणार आहे.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी