गौतमी पाटील आणि निक शिंदे एकत्र झळकणार! “सुंदरा” गाण्याचे टीझर प्रदर्शित

  75

गौतमीचं ठसकेबाज नृत्य आणि निकची खतरनाक हुकस्टेप साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचा टीझर भेटीला


New Song's Teaser: गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी “सुंदरा” हे रोमॅंटिक गाणे घेऊन येत आहे. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरची माहिती नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. या टीझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा, मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील “सुंदरा” असे सुंदर कॅप्शन असलेली पोस्ट त्यांनी सोशल मिडियावर शेयर केली आहे.   या गाण्यात निकसोबत गौतमी दिसणार असल्यामुळे हे गाणे जबराट असणार आहे, यात काही शंका नाही.


साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. रोहित नागभिडे यांनी ख्वाडा, टीडीएम, लगन अश्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. संगीत नियोजन सिद्धांत बोरावके याने केले आहे. हे गाणं २३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 
Comments
Add Comment

Dashawtar Marathi Movie: दिलीप प्रभावळकर एका गूढ अवतारात, १२ सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा एक नवा आणि गूढ अवतार लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. झी स्टुडिओज

SRK house Mannat Renovation: शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यावर अनधिकृत बांधकाम! नेमकं प्रकरण काय?

SRK house Mannat Renovation Controversy: बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आणि त्याचा मन्नत हा बंगला सध्या वादाच्या

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत मोठा अपघात! थोडक्यात बचावली; नेमकं काय घडलं?

Priyanka Chopra: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट

All Is Well Movie : ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात!

मुंबई : मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते.

Tushar Ghadigaonkar : शॉकिंग! मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या; मित्र म्हणाला, 'तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो'...

मुंबई : मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम

सलमान खानच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच!

मुंबई: ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ च्या प्रचंड यशानंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा तिहेरी डोस