मुंबई : MPSC परीक्षा दरम्यान मोठे घोटाळे होताना अनेक उदाहरणे आयोगासमोर आलेले आहेत. घोटाळ्यांवर आळा आलण्यासाठी एमपीएससी आयोगाने नवीन बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे एमपीएससी फॉर्म भरताना उमेदवारांना आयोगाच्या सुचनांच पालन करावे लागणार आहे. जर उमेदवारांनी आयोगाचं पालन नाही केल तर त्यांना नाहक त्रास सहन करावा लागेल. याप्रकरणी MPSC आयोगाने तीन पानी पत्रक प्रसिद्ध केलं आहे...
एमपीएससी आयोगाने नेमकं काय म्हटलंय....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणं अनिवार्य असणार आहे. . यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलं आहे. प्रत्येक अर्ज भरण्यापूर्वी जर उमेदवारानं केवायसीची पडताळणी केली नाही तर त्याला अर्ज भरता येणार नाही. त्यामुळं उमेदवाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो...