राज्यातील बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केल्या सूचना


मुंबई : महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्या. किनारपट्टीच्या विकासासाठी केंद्रीय आणि राज्य विभागाची एकत्रित बैठक ही एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले.


राज्यातील बंदर विकास आणि महत्वाच्या प्रकल्पांविषयी केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री राणे यांच्या उपस्थितीत केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांची एकत्र बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री सोनोवाल आणि राज्याचे मंत्री राणे बोलत होते. बैठकीस बंदरे व परिवहन सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ, एमबीपीटीचे उपाध्यक्ष आदेश तितारमारे, डिजिसीएचे महासंचालक श्याम जगन्नाथ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले की, सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात भरपूर संधी आहेत. महाराष्ट्रातील बंदरे क्षेत्रातील प्रकल्प महत्वाचे असून त्यासाठी लागणाऱ्या परवानगी लवकर देण्यात याव्यात. रेल्वे आणि रस्ते मार्गाने बंदराची जोडणी करणारे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत. सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले प्रकल्प २०२६ सालापर्यंत पूर्ण करावेत.


मंत्री राणे म्हणाले की, केंद्रीय विभागांची परवानगी वेळेत मिळण्यासाठी दोन्ही विभागणी समन्वयाने काम करावे. तसेच या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न व्हावे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन खर्चात बचत होईल. आजची बैठक ही सकारात्मक झाली असून यामुळे राज्यातील बंदर विभागाची कामे गतीने मार्गी लागतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या बैठकीमध्ये वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रकल्प, आनंदवाडी बंदर, रो रो सेवा, वॉटर टॅक्सी, अंतर्गत जलमार्ग, जेटीचे प्रश्न याबाबत चर्चा झाली.

Comments
Add Comment

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत