अकोले ते पंढरपूर सायकल वारीचे अगस्ती येथून प्रस्थान

अकोले : ज्ञानोबा माऊली तुकाराम.जय हरी विठ्ठल.अशा जयघोषात पावसाच्या रिमझिम सरींचा सूर मिसळला होता. विठू नामाच्या जयघोषाने तयार झालेल्या भक्तीमय व उत्साहाच्या वातावरणात आज अगस्ती आश्रम अकोले ते पंढरपूर सायकलवारीचे प्रस्थान झाले.



यावेळी योगी केशव बाबा चौधरी,अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ के. डी धुमाळ.ह.भ.प.दीपक महाराज देशमुख,डॉ. विष्णू बुळे,डॉ. मधुकर नवले, दिलीप मंडलिक, विलास नवले, निलेश सहाणे, अरुण भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.मॉर्निंग वॉक ग्रुप अकोलेचा भाग असलेला अगस्ती सायकल क्लबच्या वतीने अकोले ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे.सायकल वारीचे हे दुसरे वर्ष असून अकोले ते पंढरपूर हे ३३० किलोमीटरचे अंतर तीन दिवसात पूर्ण करणार आहेत.अकोले ते पंढरपूर सायकल प्रवासाचा मार्ग अकोले संगमनेर लोणी राहुरी नगर करमाळा टेंभुर्णी पंढरपूर असा असणार आहे.पहिला मुक्काम रुईछत्तीसी अहिल्यानगर तर दुसरा मुक्काम टेंभुर्णी येथे असणार आहे. दोन मुक्कामानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सायकल दिंडी पंढरपूर मध्ये पोहोचेल.पंढरपूर मध्ये महाराष्ट्र सायकलिस्ट असोसिएशन तर्फे वारकरी रिंगण सोहळ्या प्रमाणेच सायकल रिंगण सोहळा २२ जून रोजी आयोजित केला आहे. अकोले सायकल क्लबचे सदस्य प्रथमच या रिंगण सोहळ्यात सहभागी होत आहेत. राज्यातील पाच हजार पेक्षा जास्त सायकलिस्ट या रिंगण सोहळ्यात सहभागी होत आहेत.अकोले ते पंढरपूर सायकल वारीतून चांगले आरोग्य, पर्यावरण संरक्षण,प्लास्टिक मुक्ती,इंधन बचत,स्वच्छता अशा विविध विषयांवर ठिकठिकाणी प्रबोधन होणार आहे.आमची वारी हरित सायकलवारी ही टॅगलाईन घेऊन प्रबोधनाची वारी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.डॉ शामकांत शेटे डॉ दर्शन बंगाळ अशोक चौधरी शंकर लांडे राजेंद्र पुंड भाऊसाहेब कासार भास्कर मुठे धनंजय वाकचौरे दिलीप कोकणे किरण मालुंजकर गोरक्षनाथ आवारी सखाहरी दाते उत्तम बनकर दत्तासेठ कराळे महेश हासे वेदांत कासार महेश शेटे बुधाजी पेढेकर बबन रणपिसे गुणाजी एखंडे चंद्रशेखर आगलावे अमित वैद्य श्रावणी वैद्य कृष्णा साबळे जया साबळे मयूर साबळे ,योगेश काळे माधुरी काळे सोनाली जाधव सर्वज्ञ मोरे अनुष्का जाधव आदी सायकलिस्ट सहभागी झाले आहेत.

Comments
Add Comment

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’