पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर २४  किलो ९६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई सीमा शुल्क विभागाकडून करण्यात आली.  गांजाची तस्करी थायलंडहून करण्यात आली असून, यात दोन प्रवाशांसह गांजाची खरेदी करण्यात आलेल्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.  या गांजाची किंमत २४ कोटी ६६ लाख रुपये  असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे.

मुंबई विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली.  त्यांच्या सामानात हिरव्या रंगाची पाने सापडली असून हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले... त्याच दरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिघांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे मोबाईल देखील तपासासाठी घेण्यात आले.

मोबाईलमधील संभाषणाद्वारे परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली असून संबंधित आरोपींचा शोध सुरु आहे.  अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  पर्यटनाच्या नावाखाली अनेक प्रवाशी भारताता येतात,  त्यामुळे गांजाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. अशी माहिती चौकशी दरम्यान पुढे आली. गांजाची निर्मीती दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर होतं असते. गेल्या सहा महिन्यात १०० कोटीहून अधिक प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. बँकाॅकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येते. अशी सीमा शुल्क विभागाने माहिती दिली.....

 

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित