मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरीस घसरणीचा पाढा कायम राहिला. सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टी कोसळल्यानंतरच त्याचे पडसाद बाजारात उमटले होते. त्याचा एकप्रकारे परिसस्पर्शच अखेरच्या सत्रात झाला आहे. सेन्सेक्स (Sensex) ८२.७९ अंकाने घसरत ८१३६१.८७ पातळीवर व निफ्टी ५० (Nifty 50) १८.८० अंकांने घसरत २४७९३.२५ पातळीवर स्थिरावला आहे. आज संपूर्ण दिवसात बँक निर्देशांकात घसरणीचे सत्र कायमच राहिले आहे.
सेन्सेक्स बँक निर्देशांकात १९३.९४ अंकांने घसरण झाली असून बँक निफ्टीत २५१.३० अंकाने घसरण झाली आहे व दोन्ही बँक निर्देशांक ०.३१% कोसळले आहेत. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये सकाळप्रमाणेच ऑटो (०.५२%) समभागांनी आज वाढ नोंदवली आहे. मात्र आयटी (०.९४%),मिडिया (१.९१%), मेटल (१.२९%), पीएसयु बँक (२.०४%),रिअल्टी (१.६०%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.५६%), मिडस्मॉलकॅप फायनांशियल सर्वि सेस (१.७४%),मिडस्मॉलकॅप आयटी व टेलिकॉम (२.२३%) समभागात सर्वाधिक घसरण झाली. बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.६४ व १.७७% घसरण झाली आहे. तर एनएसई (NSE) मध्ये अनुक्रमे १.६६%, १.९९% घसरण झाली आहे. सत्राअखेरीस वीआयएक्स इंडिया अस्थिरता निर्देशांकात (VIX Volatility Index) ०.१४% घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात वीआयएक्स २.४३% घसरला होता त्याची पातळी सावरत अखेरीस कमी झाली आहे.
विशेषतः मेटल, आयटी शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजारात पडझड राहिली केवळ ऑटो समभागात झालेल्या वाढीमुळे घसरणीचा पारा स्थिरावला आहे. दुपारपासून बाजार स्थैर्यावर जात असताना पुन्हा तीन वाजल्यापासून घसरण सुरू झाली जी अखेरीस लाल रंगात बंद झाली आहे. आज सकाळी अपडेटमध्ये म्हटल्याप्रमाणे मिडकॅपवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते.अखेर बाजारात सत्राच्या अखेरीस मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये लक्षणीय घसरण झाल्यानंतर निर्देशांकातील सपोर्ट लेवल कमी पडली. गेले दोन दिवस मिडकॅप व स्मॉलकॅप संघर्ष करत आहेत. त्याला आज दुपारपर्यंत कलाटणी मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे होते. दुर्दैवाने आयटी, मेटल, फारनाशिंयल सर्विसेस समभागांच्या घसरणीमुळे बाजारात आणखी घसरण झाली आहे.
आज निफ्टीची विकली एक्सपायरीकडे गेल्याने बाजारात तशीही मंदीची परिस्थिती उद्भवली होती. मात्र जागतिक बाजारातील अस्वस्थता व समभाग विशेष कामगिरीवर बाजारात गुंतवणूकदारांची हालचाल कायम राहिली आहे. बुधवारी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कुठलाही कपात किंवा वाढ झालेली नसल्याने अखेर बाजारात याचा परिणाम बँक निर्देशांकावरदेखील जाणवला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदर निकालादरम्यान निवेदनात फेडने महागाई, बेरोजगारी, व मंद विकासाकडे अंगुलीनिर्देश केले होते. ज्याचा परिणाम दुरदृष्टी ठेवल्यास भारतावर कितपत होईल याची चाचपणी गुंतवणूकदार करत असल्याचे पहायला मिळाले आहे.
दुसरीकडे इस्त्राईल व इराण युद्धात अमेरिकेचा हस्तक्षेप असल्याची बातमी पसरल्यानंतर, व इस्त्राईलने इराणच्या नातांझ, अरक या अणुभट्ट्यांवर हल्ला केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी रात्रीच्या वेळी केलेल्या छाप्यांमध्ये इराणमधील अरक येथील 'निष्क्रिय अणुभट्टी' वर हल्ला केला. भारतीय बाजारातील कच्चे तेल (Crude Oil) WTI Futures निर्देशांकात ०.९४% वाढ झाल्याने प्रति बॅरेल किंमत ७४.२२ डॉलरवर पोहोचली होती. तर Brent Future निर्देशांकाची किंमत ०.९१ % वाढून ७७.३९ डॉलरवर पोहोचली होती.भारतातील एमसीएक्स कच्च्या तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.७५% एवढी प्रचंड वाढ झाल्याने भारतात प्रति बॅरेल दर ६४४५ रूपयांवर पोहोचले आहेत.या भाववाढीच्या संभावना बाजारात स्पष्टपणे जाणवल्या आहेत.त्यांनी इस्लामिक रिपब्लिकच्या नतान्झ अणुस्थळालाही लक्ष्य केले होते. याखेरीज संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.५०% घसरण झाली होती. भारतातील एमसीएक्सवरील सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०९% वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळा १०१०८० रूपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. आज शेअर बाजारातील एकूण चित्र पाहता उद्याही आज ट्रेड राहतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र बाजारातील आयपीओला मिळत असलेल्या प्रतिसादाकडे पाहता घरगुती गुंतवणूकदारांची भूमिका महत्वाची असेल.
आजच्या सत्राअखेरीस एजिस लॉजिस्टिक्स (Aegis Logistics), विशाल मेगामार्ट (२.६४%),स्विगी (२.३९%), टाटा कंज्युमर (२.१७%), आयशर मोटर्स (१.८६%), रामकृष्ण फोर्ज (१.१४%), टाटा कंज्युमर प्रोडक्ट (२.१७%),आयशर मोटर्स (१.८६%), महिंद्रा अँड महिंद्रा (१.७७%), विप्रो (१.५३%),अपोलो हॉस्पिटल (१.१०%), टायटन कंपनी (१.०८%), डॉ रेड्डीज (०.९७%) समभागात वाढ झाली आहे.
तर ब्रेनबिज सोल्यूशन (६.०२%), मिंडा कॉर्पोरेशन (५.१४%) फिनोलेक्स इंडस्ट्रीज (४.८५%), इंटलेक डिझाईन (४.८२%), जेएसबब्लू एनर्जी (४.६६%), झी एंटरटेनमेंट (४.६३%), वरुण बेवरेज (४.४२%),अदानी गॅस (४.३६%), नुवामा वेल्थ (४.२१%), वेदांता (४.४२%), अदानी एनर्जी (३.६०%), कॅनरा बँक (३.०८%), जेल इंडिया (२.८६%),अदानी एनर्जी सोल्यूशन (२.७०%), आयआरएफसी (२.७०%), चोलामंडलम फायनान्स (२.६७%), सीजी पॉवर (२.५२%),पंजाब नॅशनल बँक (२.३७%), टाटा पॉवर (२.२५%), अंबुजा सिमेंट (२.२५%), बजाज फायनान्स (२.०१%), बजाज होल्डिंग (१.६०%), अदानी एंटरप्राईजेस (१.५७%), टेक महिंद्रा (१.५३%) इंडसइंड बँक (१.५३%), इन्फोसिस (०.९४%) या समभागात नुकसान झाले आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,' इराण अमेरिका इस्त्राईल युद्ध व अमेरिकन फेडरल रिझर्व्हने दरकपात न केल्यामुळे आर्थिक बाबतीत अमेरिकेतील व इतर देशांतर्गत गुंत वणूकदार थोडे नाराज आहेत. ट्रम्प प्रशासन स्वतः या दरकपातीस उत्सुक होते. पण अमेरिकेतील एम्प्लॉयमेंट डाटा व महागाई व खर्च करण्यात येणारे आकडे समाधानकारक असल्याने दरकपात टाळली आहे. त्यामुळेच बाजारात युद्धा मुळे आलेली मरगळ अजुनच गडद झालेली पहायला मिळत असेल आहे.आजही कच्चे तेलाचे भाव ७२ डाॅलर च्या वर आहेत व त्यात हळूहळू वाढच होताना दिसत आहे. ही जगाची चिंता असणार आहे. अमेरिकेत ४.५% व्याजदर मिळत असल्याने इतर देशात न जाता अमेरिकेतील बाॅड मार्केट आजही आकर्षक आहे. त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम बाजारात पहायला मिळाला.बाजार फ्लॅट बंद झाला आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'निफ्टीने आठवड्याच्या समाप्ती सत्राचा शेवट मंदावल्याने बेंचमार्क निर्देशांक एका मर्यादित बँडमध्ये दोलन करत होते, ज्यामुळे सुधारात्मक प्रभाव दिसून येत होता.निर्देशांक सपाट उघडला आणि १३० अंकांच्या मर्यादेत दोलन (Oscillated) करत २४७९३.२५ वर स्थिरावला, १८.८० अंकांनी किंवा ०.०८% ने घसरला, जो सलग तिसऱ्या सत्रातील घसरणीचा टप्पा होता.मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सतत घसरणीचा ट्रेंड अधोरेखित झाला, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी निर्माण झाली. जागतिक आघाडीवर, यूएस फेडरल रिझर्व्हने त्याच्या नवीनतम FOMC धोरण निकालात, बाजाराच्या अपेक्षांनुसार,फेड रल फंड रेट ४.२५%–४.५०% वर स्थिर ठेवला. फेडने २०२५ साठी डेटा-आधारित मार्गदर्शन कायम ठेवले, ज्यामुळे तात्काळ आधाराची (Pivote) आशा कमी झाली, ज्यामुळे ' दीर्घकाळासाठी उच्च ' कथन बळकट झाले.
क्षेत्रीयदृष्ट्या, निफ्टी ऑटो निर्देशांक एकमेव उत्कृष्ट कामगिरी करणारा म्हणून उदयास आला, जो भारताच्या दुर्मिळ पृथ्वी आयात बेसमध्ये (संसाधने) विविधता आणण्याच्या धोरणात्मक हेतूने,ऑस्ट्रेलियाला टॅप करण्याच्या संभाव्यतेला सूचित करणाऱ्या मीडिया रिपोर्ट्समुळे उत्साहित झाला.याउलट, दर-संवेदनशील आणि चक्रीय पॉकेट्सना फटका बसला,निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी मेटल आणि निफ्टी मीडिया निर्देशांकांमध्ये झपाट्याने सुधारणा झाली, प्रत्येकी २% पर्यंत घसरण झाली. मिडकॅप,स्मॉल-कॅप सेगमेंटमध्ये नफा-बुकिंग दिसून आल्याने व्यापक बाजारातील भावना जोखीम-प्रतिरोधक राहिली. निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये प्रत्येकी १.५% पेक्षा जास्त घसरण झाली, ज्यामुळे बाजारा तील सहभागींनी भांडवल लार्ज-कॅप, बचावात्मक स्थितीत असलेल्या ब्लू-चिप काउंटरमध्ये वळवल्यामुळे सुरक्षिततेकडे उड्डाण झाल्याचे दिसून येते.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांकाने उच्च लाटांची मेणबत्ती (Candle) तयार केली ज्याच्या दोन्ही दिशेने सावल्या आहेत आणि चालू भू-राजकीय तणावादरम्यान एकत्रीकरण सुरू असल्याचे सूचित करतात. सलग पाचव्या आठवड्यात निर्देशांक २४,४००-२५,२०० च्या सुपरिभाषित एकत्रीकरण (Integration) टबँडमध्ये आधार देत आहे, जे वेळेनुसार सुधारणा आणि श्रेणी-बद्ध किंमत कृतीचा टप्पा दर्शवते.
वरच्या बाजूस, २५,००० पातळी हा एक प्रमुख पुरवठा क्षेत्र आहे. त्यावरील निर्णायक बंद २५,२०० वर श्रेणीच्या (Level ) वरच्या बँडकडे वर उघडेल. तथापि, हा झोन ओलांडण्यात अयशस्वी झाल्यास निर्देशांक बाजूला सरकण्यास मदत होऊ शकते. उलट, तात्काळ आधार आधार २४,७०० वर ठेवला आहे. या प्रमुख पातळीच्या खाली असलेला फरक डाउनसाइड मोमेंटमला गती देऊ शकतो, निर्देशांक २४,५००-२४,४०० पातळींमधील एकत्रीकरण श्रेणीच्या खालच्या टोकाकडे आणि प्रमुख समर्थन क्षेत्राकडे (सपोर्ट लेवल) ओढू शकतो.
आजच्या बँक निफ्टीवरील हालचालीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' चालू भू-राजकीय तणावादरम्यान बँक निफ्टीने एक लहान वरच्या सावलीसह एक बेअर कॅन्डल तयार केला जो एकत्रीकरणाचे संकेत देत होता. संरचनात्मक दृष्टिकोनातून, पुढील वाढीची क्षमता उघडण्यासाठी सतत ब्रेकआउट आणि ५६,००० मानसिक चिन्हांच्या वर बंद होणे आवश्यक असेल, निर्देशांक ५६,६००-५७,००० प्रतिकार क्षेत्राकडे वळण्याची शक्यता आहे. तथापि, हे ओव्ह रहेड पुरवठा क्षेत्र साफ करण्यात अयशस्वी झाल्यास रेंज-बाउंड क्रिया चालू राहू शकते, किंमत ५६,००० आणि ५५,००० दरम्यान दोलन होईल, ज्यामुळे बाजाराचे लक्ष स्टॉक-विशिष्ट अल्फा जनरेशनकडे वळेल. दुसरीकडे, ५५,००० पातळीं पेक्षा कमी निर्णायक ब्रेक डाउन चालू एकत्रीकरण संरचनेला नकार देईल आणि ५४,५००-५४,००० वर क्रिटिकल सपोर्ट क्लस्टरकडे सुधारात्मक हालचाल सुरू करेल. हा झोन ५०-दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अँव्हरेज (EMA) आणि मागील इम्पल्स लेग (५३,४८३-५७,०४९) च्या प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट झोनचा संगम (Integration) दर्शवितो.'