सायकलवरून पंढरपूर वारी; बहुसंख्य महिलांचा समावेश

कल्याण  : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील गणपती मंदीरपासून काल बुधवारी पहाटे पन्नास महिला, पुरुष आणि मुले यांचा चमू पंढरपूर वारीसाठी सायकलने रवाना झाला आहे. हे सर्वजण २२ जुनपर्यंत पंढरपुरात वास्तव्य करणार असून तेथे विठोबा माऊलीचे दर्शन घेऊन तेथे येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणार आहेत.
पर्यावरण, आरोग्य, पर्यटन, देवदर्शन असे या सायकल वारीचे उद्देश आहेत. बहुसंख्य महिला असलेल्या या सायकल वारीत १५ वर्षांच्या मुलापासून ७८ वर्षांच्या महिला-पुरुषांपर्यंत समावेश आहे.


त्यांच्या सोबत बस, टेम्पो, रुग्णवाहिका असून त्यात पाणी बॉटल, औषधे, खाण्याचे पदार्थ इत्यादी घेतले आहे. याचा उपयोग वारकऱ्यांसाठी व सायकल वारीत सहभाग घेतलेल्यांसाठी होणार आहे. या वारीसाठी काही नागरिकांनी आपली मदत दिली आहे. पहाटे वारीला निघण्यापूर्वी भाजपाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी या वारीसाठी खास मदत केली असून त्यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा
दिल्या आहेत.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या