Local Train Safety : लोकल ट्रेनमध्ये दरवाज्यात लटकत उभं राहणं बंद; मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

  121

लोकल ट्रेनमध्ये बॅगा घासून झालेल्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय


मुंबई : रेल्वे सुरक्षा बल आणि लोकमार्ग पोलीस यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता महत्वाची पावलं उचलली आहेत. बॅगधारक प्रवाशांनी लोकलच्या दरवाजामध्ये उभं राहू नये याची खबरदारी घेण्यासाठी संध्याकाळच्या वेळी गर्दी असताना मुख्य स्थानकात प्लॅटफॉर्मवरती अतिरिक्त जवान तैनात केले जाणार आहेत. आता लोकल ट्रेनच्या दरवाज्यात बॅग (Bag) घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी चालत्या ४ प्रवाशांचा लोकलमधून (Mumbai Local) पडून मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. संध्याकाळच्या पीक अवर्सला मुख्य स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त जवान तैनात केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी चालत्या ट्रेनमधून पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातामागे बॅग घासण्याचे कारण देण्यात आले होते. त्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर लोकांच्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा आणि महामार्ग पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.




बॅगा घासल्या अन् आठजण खाली पडले


काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेमार्गावरील दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान सकाळी ९.३०च्या सुमारास हा अपघात घडला. दोन लोकल ट्रेन आजुबाजूने जात असताना या ट्रेन्सच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्यामुळे ८ जण रेल्वे ट्रॅकवर पडले होते. मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान एक लोकल ट्रेन कसाऱ्याच्या दिशेने आणि दुसरी सीएसएमटीला जात होती. या दोन्ही लोकल ट्रेन आजुबाजूच्या ट्रॅकवरुन जात होत्या. या दोन्ही ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. यापैकी काही प्रवाशांच्या खांद्याला बॅगा लावल्या होत्या. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी ट्रेनमधून बाहेर आले होते. या दोन्ही लोकल ट्रेन एकमेकांच्या बाजूने जात असताना त्या वेगात होत्या. यावेळी काही प्रवाशांच्या बॅगचा धक्का दुसऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांना लागला आणि फुटबोर्डवर काही इंच अंतरात पाय ठेवून उभे असलेले प्रवासी ट्रेनमधून खाली पडले.




मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय



  • नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल.

  • सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमेटिक डोअर लावण्या संदर्भात विचार करण्यात येईल.

  • कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन तर कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित असणार.

  • ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार.

  • सरकारी आणि खासगी कार्यालयांनी एकच ऑफिस टाईम न ठेवता वेगवेगळे इन-आऊट टाईम ठेवावे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही