Shani Temple : भाविकांसाठी महत्वाची बातमी! 'आता रात्रीचे शनिदर्शन होणार बंद'...

  72

विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय


शनिशिंगणापूर : शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने मंदिर परिसराची स्वच्छता व सुरक्षेचे कारण पुढे करून मागच्या आठवड्यात बुधवारपासून (ता.११) रात्री १०.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत शनिचौथऱ्यावर तेल अर्पण करणे, तसेच चौथऱ्याच्या समोरून मुखदर्शन घेणे बंद केले आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्ट मालकीच्या भक्तनिवासातील अनेक खोल्यांची दुरवस्था असताना आणि गावात खासगी लाॅजमध्ये आवश्यक खोल्यांची संख्या नसताना विश्वस्त मंडळाने रात्रीचे दर्शन बंद केले. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, मुखदर्शन बंद केल्याने भाविक मुक्कामी राहू लागल्याने गावात आर्थिक उलाढाल वाढली आहे.


देवस्थान मालकीच्या तीन भक्तनिवासांमध्ये आवश्यक चांगल्या सुविधा नसल्याने व अनेक खोल्यांची दुरवस्था असल्याने भाविक जास्त असूनही बऱ्याच खोल्या रिकाम्या राहिल्या होत्या. शुक्रवारी (ता.१४) गावातील सर्व खासगी लाॅज बुक झाले होते. अनेक भाविकांना मुक्कामासाठी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व शिर्डीचा रस्ता गाठावा लागला.



भक्तनिवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


रात्रीचे दर्शन बंद केल्याने सध्या निवास व्यवस्थेची जास्त अडचण होत नसली, तरी नाताळ, दिवाळी, उन्हाळ्याची सुटी, सलग सुट्यांचे दिवस, तसेच शनिजयंती, श्रावण महिना, शनिपालट, शनिप्रदोष आदी काळात मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या लाॅजबरोबरच जेवण, चहा, नाश्ता व इतर व्यवसायांत वाढ झाली आहे. येथे नव्याने सरकते दरवाजे बसविलेले असले, तरी कडी-कुलपांचा वापर होत नसल्याने अनेक भक्तांची राहण्याची मानसिकता होत नसल्याचे चित्र आहे. येथे येणारे जास्त भाविक उच्चभ्रू असल्याने ते सर्वोत्तम रूमला अग्रक्रम देत असल्याने तशा रूम गावात अत्यल्प आहेत. देवस्थानचे पदाधिकारी व काही विश्वस्तांचे खासगी लाॅज असल्याने देवस्थानच्या भक्तनिवासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची उघड चर्चा ग्रामस्थात आहे.


निवास स्थिती, खासगी लाॅज २२, देवस्थानचे भक्तनिवास ३, एकूण खोल्या ३५९, व्यवस्था ११२० भाविक


रात्री १०.३०नंतर जास्त भाविक आले, तर त्या प्रमाणात व्यवस्था नाही. निर्णय घेतला असल्याने लवकरच प्रसादालयावरील निवासाच्यावर एक नवीन मजला करणार आहे. एक कोटी रुपये खर्चाचे नूतनीकरण काम लवकरच हाती घेणार आहे.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल