मुंबई विद्यापीठाची सुधारणा, शिक्षण संस्थाच्या यादीत १७ व्या क्रमांकावर...

मुंबई : क्वॅकेरली सायमंडतर्फे (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी  २०२६ नुकतीच जाहीर करण्यात आली.  गतवर्षीयाच्या तुलनेत विद्यापीठांच्या सुधारणा करुन भारतातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थाच्या यादीत १७ व्या क्रमांकावर झेप घेतली. जागतिक विद्यापीठ क्रमवारीत मुंबई विद्यापीठाने (Mumbai University)  सुधारणा करुन ७११ ते ७२० क्रमवारीच्या बँडमधून बाहेर पडत ६६४ वे स्थान पटकावले...

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी (QS World University) रैंकिंगच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत एम्प्लॉयमेंट आऊटकममध्ये सर्वाधिक ९५ गुण प्राप्त केले आहेत. त्यापाठोपाठ सायटेशन पर फॅकल्टी वर्गवारीत ५३.७, सस्टेनॅबिलिटी ४१.३, एम्प्लॉयर रेप्युटेशन ३१.५, इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क २७.६, त्याचबरोबर एकेडमिक रेप्युटेशन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रमाण आणि फॅकल्टी स्टूडेंट्स रेशोमध्येही विद्यापीठाने उत्तम कामगिरी केली आहे.

देशपातळीवर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाने उत्तम कामगिरी करीत विजेतेपद पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नियतकालिकांमधील शोधनिबंधांमध्ये १५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाशी संलग्नित असलेले ८० हून अधिक प्राध्यापक हे विविध व्यावसायिक कार्यकारणींवर कार्यरत आहेत. तर गेल्या पाच वर्षात १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने प्राध्यापकांना गौरविण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी  म्हणाले की, "विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि साश्वत प्रयत्नांची ही फलनिश्पती आहे. रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने युडीआरएफसारखे अभिनव प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, शाश्वत विकास आणि प्राध्यापक भरती यामुळे भविष्यात रँकिंगमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील", असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी मत व्यक्त केलं...

 
Comments
Add Comment

अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत

आरोहच्या अंतर्मनातील महापूर

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल रेगे चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला कलाकार म्हणजे आरोह वेलणकर. महापूर नावाचं नाटक तो

itel A90 लिमिटेड एडिशन लाँच मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनसह ७००० रूपयांत लाँच

MIL STD 810H - सह मिलिटरी-ग्रेड टफनेस आणि धूळ, पाणी आणि थेंब प्रतिरोधकतेचे 3P कंपनीकडून आश्वासन परवडणाऱ्या किमतीत

आधी वंदू तुज मोरया...

महाराष्ट्रात आणि देशातही घराघरांत पोहोचलेला आणि आबालवृद्धांचा आराध्य दैवत गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून

मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.

ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली