Monolithisch India IPO Listing: कंपनीचे बाजारात धमाकेदार पदार्पण! कंपनीचे शेअर्स ७०% प्रिमियम दरात सूचीबद्ध!

प्रतिनिधी: आज मोनोलिटीसच इंडिया लिमिटेड (Monolithisch India Limited) कंपनीचा आयपीओत दमदार कामगिरी करत शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. या आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीला १८२.८९ पटीने एकूण सबस्क्रिप्शन मिळाले आहे. लिस्टिंगचा पहिल्याच दिवशी हा समभाग (Shares) मूळ प्राईज बँड किंमतीच्या थेट ६२% हून अधिक प्रिमियम दराने बाजारात सूचीबद्ध केला गेला. त्यामुळे हा शेअर्स सकाळच्या सत्रात ५% अप्पर सर्किटवर झळकला होता. दुपारपर्यंत ७० रुपयांहून अधिक दराने हा समभाग बाजारात विकला जात आहे.


यापूर्वी कंपनीचे सूचीबद्ध नसलेल्या समभाग तर ग्रे बाजारात २७% अधिक दराने विकले जात असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. एका संकेतस्थळावरील माहितीनुसार हा असूचीबद्ध शेअर्स ग्रे बाजार (Grey Market) मध्ये १८२ रूपयाने विक्रीला उपलब्ध होता. सध्या मूळ लिस्टिंग किंमतीच्या ७० टक्के अधिक दराने हा समभाग विकला जात आहे. कंपनीने आपला आयपीओ बाजारात आणताना १४३ रूपये प्रति समभाग इतका प्राईज बँड (Price Band) निश्चित केला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी १३५००० रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. १२ जून ते १६ जून कालावधीत हा आयपीओ खुला करण्यात आला होता.


यामधील एकूण आयपीओतील गुंतवणूकीसाठी वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांना ६६.३७%, अँकर गुंतवणूकदारांसाठी ३९.८०%, मार्केट मेकर ७.०२%<विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी १९.९४%, तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ४६.४८% यांना आरक्षित करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, आतापर्यंत ३१० कोटी रुपये कंपनीने आयपीओतून प्राप्त केले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ९४.७१ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४५९.९९ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे.


२०१८ साली ही कंपनी स्थापन झाली होती. ही कंपनी हीट इन्सुलेशन रिफेक्टरी स्पेशलाईज 'रॅमिंग मास' तयार करते. हे उत्पादन लोह व भट्टीत मुख्यतः वापरले जाते. कंपनीची SGB 777, SLM 999, BG 77 , व तत्सम उत्पादने बाजारात वापरली जातात. प्रामुख्याने ही कंपनी बी टू बी स्तरावर अधिक कार्यरत असून तांबे, स्टील उत्पादक जास्तीकरून यांचे ग्राहक आहेत.


कंपनीच्या आर्थिक महसूलात आर्थिक वर्ष २०२४-५ मार्चमधील ६८.९४ कोटींच्या तुलनेत वाढ होत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ९७.४९ कोटींपर्यंत वाढले होते तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील ८.५१ कोटींच्या तुलनेत वाढ होत आर्थिक वर्ष २०२५-२६ मार्चपर्यंत १४.४९ कोटींपर्यंत नफा वाढला आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ३१०.८२ कोटी रुपये आहे.

Comments
Add Comment

येत्या ३ आणि ४ डिसेंबरला अर्ध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने

उत्तन-विरार सी लिंकला हिरवा कंदील

५८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या आराखड्यास मान्यता मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या

माझा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांनाच खासदार नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ उमेदवारांनी घेतले खासदार राणे यांचे

ट्रायची स्पॅम कॉलवर कारवाई करण्यास सुरुवात

मुंबई : अनेक दिवसांपासून मोबाईल युजर्स हे स्पॅम कॉलबाबत तक्रारी करत होते. अनेकांना अनोळखी नंबरवरून कॉल यायचे आणि

मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषणात वाढ

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून, धुके आणि धूलिकणांमुळे यात आणखी भर

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या तारखेत बदल !

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८