जिल्ह्यातील देवकुंड, सिक्रेट पॉइंट, ताम्हणी घाट बंद

माणगावमधील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी


अलिबाग  : माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत भिरा गावाच्या हद्दीतील देवकुंड धबधबा, सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉइंट व ताम्हणी घाट हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहेत.


सिक्रेट पॉइंट या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने, तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवितहानी होऊ शकते. या कारणांमुळे १७ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.


या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे सुरू असते. तसेच पावसामुळे धोकादायक झालेले धबधबे, दऱ्यांचे कठडे, सेल्फी काढणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, रिल्स व्हीडिओ बनविणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.


धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरीत्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे. धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जीवितहानी होईल, असे वागणे, वाहने अतिवेगाने व वाहतूक निर्माण होईल अशा प्रकारे चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, शेरेबाजी करणे असे कोणतेही वर्तन करणे, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे, धरण, तलाव, धबधब्याच्या १ कि.मी. परिसरात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, अत्यावश्यक सेवा वगळून प्रवेश करण्याला प्रशासनाने बंदी घातली आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.