Solapur Accident News : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक! वाहनचालक जागीच ठार

नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास


सोलापूर : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Hyderabad National Highway) मुळेगाव तांडा परिसरात बुधवारी (दि. १८) सकाळी कंटेनरने ॲसिडच्या टँकरला धडक दिल्यामुळ भीषण अपघात (Accident News) घडलाय. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ॲसिडने भरलेल्या टँकरला जबर धडक दिली. या अपघातात एका वाहनचालकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.



नागरिकांना श्वास घेण्यात अडचणी


भरधाव कंटेनरने दुभाजक ओलांडून थेट समोरून येणाऱ्या टँकरला धडक दिली. कंटेनरने धडक दिलेल्या टँकरमध्ये नायट्रिक ॲसिड भरलेले होते. अपघातानंतर टँकरमधून नायट्रिक ॲसिड बाहेर पडले. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यात अडचणी येत आहेत. या अपघातात एका चालकाचा जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.



चालकाचा जागीच मृत्यू


दरम्यान, कंटेनर रिव्हर्स घेत असताना कंटेनर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. राम लखन चव्हाण (48) असे मृत चालकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर भिवंडीच्या दिशेने जात असताना चालकाने रिव्हर्स घेतला. मात्र मागील बाजू उंच असल्यामुळे तोल जाऊन कंटेनर पलटला आणि चालक त्यात अडकून दबला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. भिवंडी-कल्याण मार्गावरील (Bhiwandi Kalyan Road) पाईपलाईन परिसरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातामुळे भिवंडी-कल्याण मार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.


घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघातासंदर्भात पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

Pune News : धक्कादायक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा छळ, ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात तब्बल ३३ तास अखंड सुरू राहिलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून

उकळत्या पाण्याने केला घात, PSI परीक्षेत राज्यातील मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारींचा मृत्यू

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून २०२३

नियमित रेशन न घेणारे ठरणार अपात्र

३४ हजार ७१४ लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद अलिबाग (प्रतिनिधी) : रेशनवरील धान्याची उचल वेळोवेळी न करणाऱ्यांचा

नागपुरात जड वाहनांना लाल सिग्नल : या वेळेत प्रवेश बंद !

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या त्रासाचा विचार करून वाहतूक

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क