Health: दह्यात मीठ टाकून खावे की साखर? जाणून घ्या काय योग्य ते

मुंबई: दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. दिवसा दही खाणे शरीरास आरोग्यदायी मानले जाते. अनेक पदार्थ बनवण्यासाठीही दह्याचा वापर केला जातो. दरम्यान, याच्या सेवनाबाबत मात्र नेहमीच संदिग्धता असते की दह्यात मीठ टाकावे की साखर...

दह्यात मीठ टाकून खाल्ल्याने हे होतात परिणाम


मीठ मिसळल्याने दह्यातील चांगले बॅक्टेरिया संपतात. यामुळे दह्याच्या सेवनाने शरीरास तितका लाभ होत नाही.

जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर दह्यामध्ये मीठ टाकून खाऊ नये. यामुळे शरीरास नुकसान होते.

आयुर्वेदानुसार दह्यामध्ये मीठ टाकून खाल्ल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. पित्ताची समस्या वाढू शकते. अशातच पित्ताची समस्या असलेल्या लोकांनी दह्यात मीठ टाकून सेवन करू नये.

दह्यासोबत साखर किती फायदेशीर


दह्यामध्ये साखर मिसळून खाणे लोकांना आवडते. याचा शरीरावरही परिणाम दिसतो. यामुळे पचनसंस्थेला सपोर्ट मिळतो.

साखरेमुळे दह्यातील चांगले बॅक्टेरिया संपत नाहीत.

साखर मिसळून गोड दही खाल्ल्यास पोटाची जळजळ कमी होण्यास मदत होते.

दह्यात साखर मिसळून खाल्ल्यास बॉडीला हाय कॅलरीज मिळतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

डायबिटीज असलेल्या लोकांनी गोड दही खाऊ नये. यामुळे ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होऊ शकतो.

असे करावे सेवन


दह्यामध्ये चवीसाठी तुम्ही किंचित मीठ अथवा साखर टाकू शकता. मात्र तुम्हाला काही त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे. यामुळे शरीरास नुकसानही होऊ शकते. आरोग्य तज्ञांच्या मते दह्याच्या सेवनाने शरीरास अनेक लाभ मिळू शकतात. अशातच साखर अथवा मीठ न घालता दही खाल्ल्यास त्याचे अधिक फायदे होतात.

 
Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर