धक्कादायक ! सात ते आठ वाहने एकमेकांना धडकली, मुंबई पोलिसांच्या वाहनाचा समावेश...

अलिबाग : अलिबाग मुंबई पुणे दृतगती मार्गावर (mumbai pune  express highway)  भीषण अपघात झाला.  या अपघातात सात ते आठ वाहने एकमेकांना धडकली, महत्वाचे म्हणजे यात पोलसांचे एक वाहन होते. अपघातात सहा  पोलीस आणि पाच बांगलादेशी (Bangladeshi) नागरिक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबई – पुणे दृतगती मार्गावर भातान बोगद्यात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर आडवा झाला होता. पोलिसांमार्फत कंटेनर काढण्याचे काम सुरु असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने कंटेनरला धडक दिली.



टेम्पोच्या मागून अतिशय वेगात येणारी वाहने एकमेकांवर आदळली.यात मुंबई पोलिसांच्या वाहनाचा देखील समावेश आहे.  पोलीस वाहनामध्ये घुसखोरी बांगलादेशी नागरिक होते. संबंधित बांगलादेशींना पोलीस घेऊन जात असताना, अपघातात बांगलादेशी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई आणि वसई – भाईंदर येथून पोलिसांनी बांगलादेशींना ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांचा ताफा पुण्याच्या दिशेने निघालेला होता.  अपघातानंतर दृतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. अपघातात पोलीस वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, दृतगती मार्गावरील वाहने सुरुळीत सुरु आहेत...

 
Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई