RBI News: आरबीआयकडून Re Issue ची घोषणा! बँक २७००० कोटींची सिक्युरिटीज विकणार!

प्रतिनिधी: केंद्र सरकारने सरकारी सिक्युरिटीजची रि- इशू (Re Issue) करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या सिक्युरिटीजची विक्री होणार असून सरकारला या माध्यमातून २७००० कोटींचा निधी मिळणार आहे अशी घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सिक्युरिटीजची विक्री दोन टप्प्यांत होणार आहे. प्रथम टप्प्यात १५००० कोटींची ६.७५ टक्के व्याजदराने व उर्वरित १२००० कोटीची सिक्युरिटीज (Securities) ७.०९ टक्के व्याज दराने दिल्या जाणार आहेत.

नक्की रि इशू (Re Issue) म्हणजे काय?

आरबीआय जेव्हा बाजारातील अतिरिक्त बॉण्ड अथवा सिक्युरिटीज विकते. त्यातून सरकारला पैसा मिळतो. सरकार अधूनमधून अश्या पद्धतीने निधीचे संकलन करत असते.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या सिक्युरिटीजमधील अतिरिक्त २००० कोटींच्या सिक्युरिटीज आपल्याकडे राखून ठेवण्याचा पर्याय सरकारने हातात ठेवलाय. २० जूनला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या सिक्युरिटीजची बोली (Auc tion) लावणार आहे.मुख्य म्हणजे या सिक्युरिटीज बोली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने विशेषतः ई कुबेर सिस्टिम (E Kuber System) नुसार विकल्या जातील. सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत गैर स्पर्धात्मक पद्धतीने (Non Competitive Bids) बोली लागतील. तर स्पर्धात्मक बोली (Competitive Bids) सकाळी १०.३० ते ११.०० दरम्यान खुल्या असतील.

या दोन्ही पद्धतीच्या बोलीचा निकाल आरबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल असे आरबीआयने म्हटले. २० जूनला हा निकाल असणार आहे. व यशस्वी गुंतवणूकदारांने खरेदी किंमत २३ जूनला भरायची आहे. याच दिवशी रि इशू होईल अस आरबीआयने म्हटलंय. या सिक्युरिटीजवरील व्याजदर हा सिक्युरिटीजचा किरकोळ (Nominal) किंमतीवर खरेदी केलेल्या तारखेपासून ते शेवटच्या कूपन पेमेंट (Coupon Payment) तारखेपर्यंत मिळणार आहे. यापूर्वी सेंट्रल बँकेने याच महिन्यात ३२००० कोटींची सिक्युरिटीज रि इशू करणार असल्याचे घोषित केले होते.

रि- इशू पुन्हा जारी केल्यानंतर विद्यमान चलनाच्या आधारे सरकारला अतिरिक्त युनिट विकण्याची संधी मिळते व बाजारातील तरलता (Liquidity) या आधारे नियंत्रित करता येते.
Comments
Add Comment

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

आंगणेवाडी भराडी देवी जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २६ रोजी

मसुरे : प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या, नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची