मैत्रीचा 'अंकुश'! नाना पाटेकरांनी मित्रासाठी उचललं मोठं पाऊल

मुंबई: बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिलदार अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या उदार स्वभावासाठीही ओळखले जातात. इंडस्ट्रीत त्यांचे अनेक मित्र त्यांच्या स्वभावाबद्दल किस्से सांगतात. असाच एक खास किस्सा सध्या चर्चेत आला आहे, ज्यात नानांनी आपल्या जिवलग मित्रासाठी, दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्यासाठी चक्क आपलं स्वतःचं घर गहाण ठेवलं होतं.


एन. चंद्रा यांना 'अंकुश' या चित्रपटातून खरी ओळख मिळाली आणि याच चित्रपटाने नाना पाटेकरांनाही प्रसिद्धी मिळवून दिली होती. एन. चंद्रा जेव्हा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते आणि त्यांना पैशांची खूप गरज होती, तेव्हा त्यांनी नाना पाटेकरांकडे मदतीचा हात मागितला. त्यावेळी नाना पाटेकरांकडेही पुरेसे पैसे नव्हते. पण मित्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नानांनी जराही विचार न करता, आपलं घर गहाण ठेवून पैशांची व्यवस्था केली.


नानांच्या या मदतीमुळे एन. चंद्रा आर्थिक अडचणीतून बाहेर पडले. नंतर त्यांनी नानांचे पैसे लगेच परत केले आणि नानांना त्यांचं घर परत मिळालं. या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एन. चंद्रा यांनी नाना पाटेकरांना एक स्कूटर भेट दिली होती.


नाना पाटेकर हे फक्त मित्रांनाच नाही, तर अनेक गरजू लोकांनाही नेहमी मदत करत आले आहेत. त्यांच्या 'नाम फाउंडेशन' च्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकरी कुटुंबांना आणि सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय योगदान दिलं आहे.


नानांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या 'हाऊसफुल्ल ५' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहेत. नाना पाटेकर यांचा हा मैत्रीचा आणि उदार स्वभावाचा किस्सा त्यांची वेगळी बाजू दाखवतो, ज्यामुळे इंडस्ट्रीत आणि जनसामान्यांमध्येही त्यांना आदर मिळतो.

Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी