शरण येणार नाही, खमेनेईने केले जाहीर

तेहरान : शरण येणार नाही, असे इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनेई (Ali Khamenei) यांनी जाहीर केले. इस्रायलने इराणवर हल्ला करुन स्वतःची कबर खोदली आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी इस्रायलला भयानक परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याची धमकी दिली. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सहा दिवस झाले तरी संपण्याची चिन्हे नाहीत. संघर्षाची तीव्रता वाढू लागली आहे.

इराण नव्याने तयार करत असलेल्या अण्वस्त्रांमुळे आमच्या सुरक्षेला धोका आहे, अशी भूमिका घेत इस्रायलने इराण विरुद्ध हवाई हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देणे सुरू आहे. इस्रायल प्रामुख्याने इराणची सैन्य शक्ती कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे तर इराण इस्रायलमध्ये कधी नागरी वस्तीवर तर कधी सैन्याशी संबंधित आस्थापनांवर हल्ले करत आहे. इस्रायलने अली खमेनेई यांना ठार मारण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. याआधी इस्रायलने इराणच्या अनेक सैन्याधिकाऱ्यांना आणि गुप्तचर अधिकाऱ्यांना ठार केले आहे.

इस्रायलने १७ - १८ जूनच्या रात्री इराणची राजधानी असलेल्या तेहरान तसेच इराणच्या लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या आस्थापनांना आणि सैन्य तळांना लक्ष्य करुन मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यानंतर ट्रुथ या सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवी पोस्ट टाकली आहे. यात 'unconditional surrender' अर्थात 'बिनशर्त शरणागती' असे दोनच शब्द नमूद आहेत. ही पोस्ट इराणला उद्देशून करण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनेई (Ali Khamenei) यांना जीवंत राहायचे असल्यास इराणने बिनशर्त शरणागती मागावी, अशा स्वरुपाची ही पोस्ट असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनेई (Ali Khamenei) यांनी टीव्हीवरुन देशाला उद्देशून केलेल्या भाषणात शरण येणार नाही, असे जाहीर केले.



इस्रायलने इराणवर हल्ला करुन स्वतःची कबर खोदली आहे. त्यांना भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल. अमेरिकेने इराणवर हला केला तर त्यांनाही भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल; असे इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनेई (Ali Khamenei) यांनी टीव्हीवरुन देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जाहीर केले.



अमेरिकेच्या युद्धनौका इस्रायलच्या सीमेजवळ

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून इस्रायलचे रक्षण करण्यासाठी यूएसएस द सुलिव्हन्स आणि यूएसएस आर्ले बर्क या अमेरिकेच्या युद्धनौका इस्रायलच्या सीमेजवळ समुद्रात तैनात आहेत. इस्रायलच्या विमानांना हवेतच इंधन पुरवठा करण्यासाठी अमेरिकेच्या इंधन वाहक विमानांचे पथक आखाती देशांमध्ये सज्ज आहे. अमेरिकेच्या सैन्याने सुरू केलेल्या हालचालींमुळे इराण - इस्रायल संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



 
Comments
Add Comment

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेच्या अपयशासाठी इराणने अमेरिकेला धरले जबाबदार

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील निष्फळ झालेल्या चर्चेनंतर, इराणने म्हटले आहे की, वाटाघाटी अजून संपलेल्या नाहीत.

Iran-US Peace Treaty : ४० दिवसांच्या संघर्षाची २१ तास चाललेली चर्चा निष्फळ; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली बहुचर्चित शांती चर्चा अखेर

Iran-US Peace Treaty : अमेरिका-इराणचे शिष्टमंडळ दाखल, इराणच्या चार प्रमुख मागण्या

शस्त्रसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन

Chimpanzees Civil War : सातासमुद्रापार सेंट्रल, वेस्टर्नचा संघर्ष पेटला, एकेकाळी मित्र असलेले घेतायत एकमेकांचा जीव

कंपाला : एकेकाळी एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं राहणारे चिम्पांजी एकेमकांच्या जीवावर उठल्याचा प्रकार घडला आहे.

Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेपूर्वी तणाव शिगेला! अमेरिकेच्या 'त्या' कृतीची आठवण करून देत इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल

अमेरिकेसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या शांतता चर्चेसाठी इराणचे ७१ सदस्यीय शिष्टमंडळ शुक्रवारी (१० एप्रिल) उशिरा