कस्टम डॉक्युमेंटेंशन कोर्समध्ये पहिली बॅच यशस्वी

वाढवण पोर्ट स्किलिंग प्रोग्राम


यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र


पालघर : स्थानिक तरुणांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाढवण पोर्ट स्किलिंग प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत येणाऱ्या कस्टम डॉक्युमेंटेंशनचा कोर्स पहिल्या तुकडीने यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. यामधील दोन विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
व्हीपीपीएलने वाढवणमधील तरुणांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे संभाव्य उमेदवारांना माहिती मिळवणे आणि कार्यक्रमासाठी नोंदणी करणे सोपे झाले आहे.


वाढवण पोर्ट स्किलिंग प्रोग्रामला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे, आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक नोंदणी स्किलिंग प्रोग्रामसाठी झाल्या आहेत. दरम्यान, वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडने बृहन्मुंबई कस्टम ब्रोकर्स असोसिएशन (बीसीबीए) च्या सहकार्याने वाढवण पोर्ट स्किलिंग प्रोग्राम अंतर्गत कस्टम डॉक्युमेंटेंशनवरील पहिला कोर्स १६ एप्रिल २०२५ रोजी सुरू केला. या कोर्समध्ये सहभागी युवक युवतींना बंदरांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या कस्टम प्रक्रिया, दस्तऐवजीकरण आणि प्रक्रियांचे व्यापक ज्ञान देण्यात आले. त्यामुळे कस्टम क्लिअरन्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात आवश्यक असलेले मूलभूत ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये त्यांना प्राप्त झाली आहेत.


१०० तासांच्या प्रशिक्षणासह ४ आठवडे चालणारा हा कोर्स मुंबईतील नरिमन पॉइंट येथील बीसीबीए कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये प्रत्यक्ष व्यावहारिक माहितीचा समावेश होता. अभ्यासक्रमात आयात-निर्यात प्रक्रिया, कस्टम दस्तऐवजीकरण, क्लिअरन्स प्रक्रिया आणि अनुपालन आवश्यकता यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होता. या अभ्यासक्रमामुळे बंदर आणि लॉजिस्टिक्स ऑपरेशन्सच्या वास्तविक जगाची ओळख युवक युवतींना झाली आहे.

Comments
Add Comment

विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा