सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी तब्बल ४४ नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या महापालिकेच्या बालेकिल्ल्यात प्रबळ विरोधक म्हणून तरी आता भाजपचे नाव घेतले जात आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचे शासन महापालिकेत असावे, आणि ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून वसई-विरारचा विकास व्हावा, असा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. मात्र बहुजन विकास आघाडीच्या शिट्टीने भाजपचे तिसरे इंजिन रोखले. असे असले तरी ४४ नगरसेवकांचा मोठा डबा मात्र भाजपने डबल इंजिनच्या जोरावर काम करण्यासाठी वसई-विरारच्या राजकारणात पहिल्यांदा आपल्या इंजिनसोबत जोडून घेतला आहे.


आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पालघर जिल्ह्याची मोठी राजकीय ओळख म्हणजे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष. अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगरपरिषद राजकारणात गेली ३५ वर्ष बहुजन विकास आघाडीचेच एकहाती वर्चस्व आहे. वसई-विरार महापालिका झाल्यानंतर दोन्ही वेळा महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा राहिला. बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीन विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचेच आमदार अशी राजकीय आणि संघटनशक्ती असलेल्या बहुजन विकास आघाडीला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा हादरा बसला. बहुजन विकास आघाडीचे विधानसभेचे तीनही गड महायुतीच्या उमेदवारांनी जिंकले. त्यानंतर १३- १४ महिन्यातच झालेल्या वसई-विरार महापालिका निवडणुकीत २०१५ च्या तुलनेत नगरसेवकांची संख्या घटली असली तरी बहुजन विकास आघाडीने ७१ नगरसेवकांच्या माध्यमातून तिसऱ्यांदा महापालिकेवर आपला झेंडा फडकवला. या निकालाने २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत बहुजन विकास आघाडीच्या समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तर दुसरीकडे सतत १० वर्ष महापालिकेच्या सभागृहात केवळ एक नगरसेवक राहिलेल्या भाजपला ४४ असा मोठा आकडा असलेले नगरसेवक निवडून आणण्यात यश आल्याने भाजपच्या गोटातही सत्ता मिळाली नाही याचे एवढे दुःख नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही भागात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे असे संकेत या निकालाने दिले आहेत.


सर्वांगीण विकासासाठी समन्वय महत्वाचा : महापालिकेत आता बहुजन विकास आघाडी आणि राज्य आणि केंद्र शासनात महायुतीची सत्ता आहे. नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील हे पदावर विराजमान होताच त्यांनी सर्वांना सोबत घेऊन वसई-विरारचा विकास करण्याची ग्वाही दिली आहे. महापालिका क्षेत्रात तीन आमदार येतात. त्यामुळे विकासकामांसाठी आमदार आणि महापौर यांच्यामधील समन्वय महत्वाचा राहणार आहे. अतिक्रमित मालमत्ता धारकांना शास्ती, ओसी धोरण, झोपडपट्टी पुनर्विकास, शहराच्या कानाकोपऱ्यात पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, फेरीवाला धोरण, पालिका कर्मचाऱ्यांना नियमित करणे आणि उत्पन्न वाढ अशा अनेक बाबी महापालिकेला भविष्यात कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या सर्व कामांसाठी कोणाची काय भूमिका राहणार हे तर येणारा काळच सांगणार आहे. पक्ष संघटन वाढविण्यासाठी दोन्ही राजकीय पक्षांनी खुशाल प्रयत्न करावेत, मात्र वसई-विरारच्या नागरिकांसाठी मतभेद न करता विकासाचे इंजिन सुसाट पळवावे, अशी अपेक्षा मतदारांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Mahakumbh Mela 2027 : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ची तयारी वेगात; साधुग्राम व्यवस्था अधिक सक्षम

नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने साधुग्राम आणि

Nashik Crime News : भोंदू खंडागळेला चार दिवसांची पोलिस कोठडी; पीडित महिलेच्या पुनर्वसनासाठी नाशिककर सरसावले

नाशिक : गुजरातच्या वलसाड येथील महिलेला फसवून तिच्याकडून ७७ हजार रुपये उकळल्याप्रकरणी नाशिकच्या फुलेनगर येथील

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

World Vada Pav Day 2026 : मुंबईच्या रस्त्यांपासून जगभरात पोहोचलेला वडापाव; जाणून घ्या या ‘देसी बर्गर’ची खासियत!

मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे वडापाव! मुंबईच्या गजबजलेल्या