Thane School Dengue Outbreak: ठाणे येथील शाळेत डेंग्यूचा प्रादुर्भाव, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना तापांचा त्रास

ठाणे: ठाणे शहरातील एका खाजगी शाळेत डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांमुळे आजारांचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण या शाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना आजाराचा प्रार्दुभाव झाला आहे. या घटनेमुळे ठाणे महानगरपालिकेने यासंबंधित अधिकृत चौकशी सुरू केली असल्याची माहिती एका नागरी अधिकाऱ्याने दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळेतील 45 हून अधिक विद्यार्थी आणि किमान पाच शिक्षकांमध्ये डेंग्यू या आजारांशी संबंधित लक्षणे आढळून आली आहेत.  (Thane School Dengue Outbreak)


दरम्यान, मनसेने हा आजार शाळेच्या आवारातील सुरू असलेल्या बांधकाम कामांमुळे पसरत असल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या बाजूला पालकांनीही राजकीय पक्षाने घेतलेल्या भूमिकेचा धागा पकडत या कामांमुळे आजूबाजूला कचरा व पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे, असे असे म्हटले आहे.


पालकांच्या एका गटाने शाळा व्यवस्थापनाकडे लेखी पत्राद्वारे तत्काळ फॉगिंग, डास निर्मूलन, आणि स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. तसेच रासायनिकमुक्त डास सापळे, मजबूत जाळ्या आणि वर्गांमध्ये अधिक पंख्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.


पालकांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले की, डासांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि विद्यार्थी तसेच शालेय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील. तसेच, शैक्षणिक संस्थांमध्ये, विशेषतः पायाभूत सुविधांशी संबंधित काम करणाऱ्या संस्थांमध्ये, कडक स्वच्छता उपाययोजना आणि सुरक्षा ऑडिटची करण्याबाबतही विचार केला जाईल.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional