काँग्रेस पक्षाचं नेतृत्व दिसतं नाही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा भाजपा प्रवेश...

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसचं नेतृत्व दिसत नाही, अशी भूमिका व्यक्त करुन यापूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ज्यांना देशासाठी आणि समाजासाठी काम करण्याची ईच्छा आहे, त्यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व दिसत नाही. आपलाच नेता भारतीय  सैन्याबद्दल बोलत असेल तर कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडलेला असतो.  त्यामुळे काँग्रेस पक्षात निराशा आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे.

माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी देेखील काँग्रेसमधून बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.  काँग्रेस आपल्या चुका सुधारत नाही किंवा आपल्या चुकांमधून काही बोध घेण्यास कमी पडत आहे, असे तुम्हाला वाटते का ? असा सवाल फडवीसांनी पत्रकारांना विचारला.

तसेच मुख्यमंत्री फडणवीस पुढे ही म्हणाले, काँग्रेसचं नेतृत्व दिशाहीन झालं आहे.  आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो. सत्तेत होतो, विरोधी पक्षात असताना, देशहिताची लाईन आम्ही कधीच सोडली नाही. त्यामुळे समाजातील लोक आमच्यासोबत आले आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीस यांनी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती चांगली कामगिरी करेल. असा विश्वास व्यक्त केला. निवडणुका असो किंवा नसो आम्ही नेहमीच चांगल्या लाकांकडे पाहत असतो, त्यांचं काम चांगलं असेल तर त्यांना पक्षात प्रवेशही देतो.  दरम्यान जयश्री पाटील यांच्या सोबत जे कार्यकर्ते भाजपात आले आहेत. त्यांची सर्वांची काळजी भाजपा पक्षात घेतली जाते. आम्ही बाहेरुन आलो आहोत ही भावना कोणीही बाळगू नका. त्यामुळे सगळ्यांची काळजी घेण आमचं कर्तव्य आहे. अशी हमी फडणवीस यांनी दिली.
Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या