Solapur Water Park Accident: पुन्हा एक अपघात! अकलूज सयाजीराजे वॉटर पार्कमधील भीषण दुर्घटना, एकाचा मृत्यू तर इतर जखमी

सोलापूर: अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या पार्कमधील एक पाळणा अचानक निसटून पडल्याने, त्यामधील तिघांना जबरदस्त मार बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती, मात्र त्यांपैकी एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सूत्रांकडून कळते.


या भीषण दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र,  उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



सोलापूर येथील प्रसिद्ध वॉटर पार्क


अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि वॉटर पार्क आहे. सोलापूरसह जवळील इतर जिल्ह्यातून याठिकाणी सुट्टीची मज्जा लुटण्यासाठी हजारो पर्यटक येतात. जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचे हे वॉटर पार्क असून दुर्दैवाने आज येथील फिरत्या पाळण्याच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी, एकाच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली असल्यामुळे त्याची प्रकृती स्थिर आहे.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध