Amarnath Yatra : १ जुलैपासून अमरनाथ यात्रा मार्ग 'नो-फ्लाईंग झोन' घोषित!

श्रीनगर : अमरनाथ यात्रा येत्या ३ जुलैपासून सुरू होणार आहे. यात्रा आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर सरकारने गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार यात्रेची सुरक्षा मजबूत करण्यासाठी पहलगाम आणि बालताल एक्सप्रेसवर हवाई निर्बंध लागू केले आहेत. यामुळे, संपूर्ण तीर्थयात्रा मार्ग आता 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.


सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागाने पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांसह अमरनाथ यात्रेचे सर्व मार्ग 'नो फ्लाईंग झोन' म्हणून घोषित केले आहेत. ही बंदी पहलगाम आणि बालताल दोन्ही मार्गांना व्यापणाऱ्या सर्व प्रकारच्या हवाई उपकरणांना लागू आहे. यामध्ये यूएव्ही, ड्रोन आणि फुगे असा सर्वांचा समावेश आहे.



अमरनाथ यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात आणि यात्रेला जातात. या काळात सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी कडक व्यवस्था केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. हे सुरक्षा निर्देश १ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत लागू असतील. तथापि, वैद्यकीय आणीबाणी, आपत्ती व्यवस्थापन किंवा सुरक्षा दलांनी राबवलेल्या देखरेखीच्या कारवाया अशा काही प्रकरणांमध्ये हा निर्णय लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अशा अपवादांसाठी तपशीलवार मानक कार्यपद्धती (एसओपी) नंतर जारी केल्या जातील.


अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रा ही लोकांची यात्रा आहे यावर भर देत जनतेकडून सहकार्याचे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तयारी केली जात आहे. यात्रेसाठी केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या (CAPF) ५८० कंपन्या तैनात केल्या जात आहेत.

Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष