अंधेरी पश्चिम भागांत गुरुवार, शुक्रवारी पाणी नाही

गोखले पुलाखाली जलवाहिनीची दुरुस्ती


मुंबई (खास प्रतिनिधी) : अंधेरी (पश्चिम) येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील १,३५० मिलीमीटर व्यासाचे प्रवाह नियंत्रण झडप (फ्लो कंट्रोल वॉल्व्ह) दुरुस्ती आणि वेसावे जलवाहिनीवरील ९०० मिलीमीटर व्यासाचे फुलपाखरू झडप (बटरफ्लाय वॉल्व्ह) बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. गुरुवार, १९ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपासून शुक्रवार, २० जून २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत एकूण ११ तास हे काम करण्याचे नियोजित आहे.


या कामादरम्यान संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा ११ तास बंद करावा लागणार आहे. त्यामुळे के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती कालावधीत म्हणजे गुरुवार, १९ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपासून शुक्रवार, २० जून २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत के पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तरी भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



या विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद


विले पार्ले पश्चिम : लल्लूभाई उद्यान, लोहिया नगर, पार्ले गावठाण, मीलन भूयारी मार्ग (सबवे), जुहू विलेपार्ले विकास योजना (जे. व्ही. पी. डी. स्कीम), जुहू गावठाण क्रमांक ०३, व्ही. एम. मार्ग, विलेपार्ले (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०) मोरागाव (जे. व्ही. पी. डी.) मोरागाव, जुहू गावठाण क्रमांक ०१ आणि ०२, विलेपार्ले (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०) गिल्बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर सिटी सोसायटी, अंधेरी (पश्चिम) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते मध्यरात्री १२.३०)

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम