पाच दिवस आधीच निघाली होती नवीन पुलाची वर्क ऑर्डर, मग कुंडमळा भीषण दुर्घटनेला जबाबदार कोण?

  53

कुंडमळा : मावळ तालुक्यातील कुंडमळा ​या प्रसिद्ध पर्यटनस्थ​ळी रविवारी झालेल्या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जातयं. ३० वर्षांपूर्वीचा पूल जीर्ण झाला होता. या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्याबाबतचा आदेश काढण्यात वर्ष निघून गेले. आसपासच्या गावांतील ग्रामस्थांचे दळणवळण, पर्यटकांच्यादृष्टीनं आकर्षक असणारे पर्यटनस्थळ यामु​ळं याठिकाणी पुलाचे काम तातडीनं होणं अपेक्षित होतं.​ मात्र लालफितीच्या कारभारामुळं पुलाचं काम रखडल्यानं या दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार असल्याचा सूर व्यक्त होतोय.​ ​



३० वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार रूपलेखा ढोरे, तत्कालीन खासदार स्व. अण्णा जोशी, त्यानंतरच्या काळात तत्कालीन आमदार स्व. दिगंबर भेगडे यांच्या प्रयत्नातून या ​पुलाचं काम झालं होतं.​ हा पादचारी स्वरूपाचा लोखंडी पूल असताना यावरून दुचाकीची ये-जा सुरू होती. ​ ​इंदुरी, कुंडमळा, सांगुर्डी, शेलारवाडी, देहूरोड या भागातील नागरिकांच्या दृष्टी​नं ये जा करण्यासाठी ​ हा मार्ग ​सोयीचा होता. त्यामु​ळं इथं नवा पूल ​ व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती.​ ​यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी ​ कुंडमळा येथे नवीन पुला​साठी निधी मिळण्यापासून ते वर्क ऑर्डर निघेपर्यंत सतत पाठपुरावा केला.



कुंडमळा इथल्या नवीन पुलासाठी कधीपासून पाठपुरावा सुरू होता



  • ३ फेब्रुवारी २०२२ : उपमुख्यमंत्री अजि​त पवार यांच्याकडे निधीची मागणी​ केली.

  • २ डिसेंबर २०२२ : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निधी​ मागितला.

  • ११ जुलै २०२४ : अर्थसंकल्पात निधीची तरतूद​ करण्यात आली.

  • १९ सप्टेंबर २०२४ : तांत्रिक मान्यता​ मिळाली.

  • १० जून २०२५ : कामाची वर्क ऑर्डर​ निघाली.


दुर्दैवं म्हणजे काम सुरू करण्याचा आदेश निघाल्यानंतर पाच दिवसांनी ​कुंडमळा इथं ही दुर्घटना घडली. आतापर्यंत चार मृत्यूमुखी पडलेत. ५० पेक्षा अधिक पर्यटक जखमी आहेत. यात अनेकजण वाहून गेल्यानं मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जातेय.​ तळेगाव दाभाडे पोलिस या भीषण दुर्घटनेचा कसून तपास करताहेत. तसेच जिल्हा प्रशासनानं चौकशी करण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन केलीय. ही समिती जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करणार आहे. यासाठी १५ दिवसाची मुदत दिलेली आहे. मात्र या ठिकाणी झालेल्या पर्यटकांच्या गर्दीला आणि हुल्लडबाजीला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


हा पूल कमकुवत असल्यानं व येथील रांजणखळगे धोकादायक असल्यानं याठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी असणं अपेक्षित होतं. तसंच, संबंधित पूल हा कमकुवत असल्यानं या पुलावरून ये-जा करू नये, असा फलकही याठिकाणी लावण्यात आलेला होता. असे असतानाही इतक्या मोठ्या संख्येनं पर्यटक येतात, पुलावरच हुल्लडबाजी करतात. वास्तविक या पुलाच्या एका बाजूला एमआयडीसी पोलिसांची हद्द तर दुसरीकडं तळेगाव दाभाडे पोलि​सांची हद्द आहे. तसेच, डिफेन्सचाही भाग येतो. मग दिवसेंदिवस अशा धोकादायक ठिकाणी वाढणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीला किंवा स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इथं रात्रंदिवस चालणाऱ्या हुल्लडबाजीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Comments
Add Comment

कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार

ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या

डोंबिवली (प्रतिनिधी) : दहीहंडीची पंढरी ही ठाणे जिल्ह्याची ओळख जागतिक पातळीवर प्रसिद्धीस

इम्तियाज जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी, थेट मुख्यमंत्र्यांना पार्टीचं निमंत्रण

१५ ऑगस्ट रोजी, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला . या निर्णयावरून,

रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद

महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरुन असलेला वाद राज्याला सर्वश्रुत आहे.रायगडच्या

रत्नागिरी : लव्ह जिहादला एकत्र येऊन उत्तर द्या, राज्यात हिंदूंचे भक्कम सरकार - नितेश राणे

रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी लव्ह

कोकणात राष्ट्रवादीला धक्का प्रशांत यादव भाजपमध्ये करणार प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंत्री नितेश राणे यांनी कोकणात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील