कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आले आहे. त्यामुळे समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा किनार्यावर आदळत होत्या.त्यामुळे किनाऱ्यानजिकच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. मिऱ्या, पंधरामाड परिसरात लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. दोन आठवड्यापूर्वीच मासेमारी सुरु झालेली असतानाही असंख्य नौका मिरकरवाडा बंदरात आश्रयाला आल्या आहेत. त्यामुळे मिरकरवाडा बंदर हाऊसफुल्ल झाले आहे.

मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मुसळधार कोसळल्यानंतर जून महिन्यात पावसाची बऱ्यापैकी हजेरी होती. जुलै महिन्यात मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले आहे. विना उसंत कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान देखील केले आहे. पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर मासेमारीसाठी गेलेल्या नौका किनार्यावर आश्रयाला आल्या आहे.

 

खोल समुद्रात उंच लाट उसळत असल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांनी नौकांसह किनार्यावर आश्रय घेतला आहे. त्यामुळे मासेमारी पु्र्णत: ठप्प झाली आहे. जाकिमिऱ्या, पंधरामाड समुद्र किनारीही लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. लाटा जोरदारपणे किनार्यावर आदळत आहेत.

मासेमारी पुर्णत: ठप्प झाल्यामुळे मिरकरवाडा बंदरातील मत्स्य विक्रिवर परिणाम झाली आहे.श्रावण महिना सुरु झाल्याने मस्त्य खवय्यांची संख्या कमी आहे. मात्र तरीही अनेक मत्स्यप्रेमी मच्छि खरेदीसाठी मिरकरवाडा बंदरात दाखल होत आहेत. अनेकांना रिकामी हाती परत जावे लागत आहे. तर किनार्या लगत मासेमारी करणार्या नौकांमुळे उपलब्ध होणाऱ्या मच्छिला सोन्याचा दर आला आहे. पापलेट सहाशे रु.किलोने, तर बोंबील २०० रु. किलोने विक्रिला जात आहे.
Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण