मागून येत होते धुराचे लोट, आगीच्या लोळामधून एकटे बाहेर पडले विश्वास कुमार, पाहा VIDEO

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी १२ जूनला एक मोठा विमान अपघात झाला. एअर इंडियाचे एक विमान जे लंडनला जात होते. ते विमान उड्डाण भरल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच क्रॅश झाले. हे विमान बीजे मेडिकल कॉलेज आणि हॉस्टेलला धडकले. अपघातानंतर मोठी आग लागली आणि चारही बाजूला गोंधळाचे वातावरण झाले.


यातच एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे.यात याच विमानातील एक प्रवासी विश्वासकुमार आगीच्या लोळामधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यांच्या हातात मोबाईल होता आणि ते शांत दिसत होते. रमेश हे विमानाच्या सीट नंबर 11Aवर बसले होते. जसे ते कॉलेजच्या परिसराबाहेर आले त्यांना एका व्यक्तीने पाहिले आणि हात पकडून सुरक्षित स्थळी आणले.


 


अहमदाबाद येथून लंडनला जात होते विमान


रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक आहेत. ते त्या २४२ प्रवाशांपैकी एक आहे जे या विमानातून प्रवास करत होते. हे विमान १२ जूनला दुपारी अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने जात होते. मात्र उड्डाण घेताच काहीच सेकंदात हे विमान कोसळले.



रमेश अपघातातून बचावले हा चमत्कार


दरम्यान, रमेश यांच्यावर अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची भेट घेतली. या भीषण अपघातातून केवळ रमेश हेच एकटे वाचू शकले. जगभरात त्यांचे वाचणे हा एक चमत्कारच म्हटला जात आहे.



घटनेच्या २८ तासानंतर भेटला ब्लॅक बॉक्स


हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलायनर होते. २०११पासून हे कार्यरत होते. पहिल्यांदाच याचा एवढा मोठा अपघात झाला. सरकारने अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यास सुरूवात केली होती. हा बॉक्स २८ तासानंतर सापडला. यामुळे विमान अपघाताच्या तपासात मदत मिळणार आहे.


Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या