स्थानिकांना दिलासा ! संरक्षण भिंत पाडणार नाही; राज्य सरकारची हमी...

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) आणि रेडिओ क्लबदरम्यान प्रस्ताविक जेट्टीसाठी समुद्रलगत असणारी सरंक्षण भिंत ३० जूनपर्यंत पाडणार नाही. अशी हमी राज्य सरकारने स्थानिकांना दिली. त्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. कोणतेही अधिकृत परवानगी नसताना, जेट्टीचं काम सुरु करण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. त्यामुळे प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती..

मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सोमवारी पार पाडल्यामुळे राज्य सरकारने स्थानिकांच्या बाजूने दिलासादायक निर्णय घेतला आहे.  त्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. जेट्टीच्या प्रकल्पासाठी भिंत पाडण्यासाठी परवानगी देण्यात आली असती, तर नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले असते.

अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. मुळातच प्रकल्पासाठी भिंत का पाडण्यात येत आहे ?  असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. समुद्रलगत असणारी भिंत ७० वर्ष जुनी आहे. प्रास्ताविक जेट्टीचा प्रकल्प हा सार्वजनिक पायाभूत सुविधा उपक्रम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक