Railway Ticket Booking: १ जुलैपासून तत्काळ तिकिटासाठी ओटीपी द्यावा लागणार - अश्विनी वैष्णव, काय आहेत नवे बदल जाणून घ्या....

प्रतिनिधी: आता रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यासाठी आधार बेस ओटीपी (Otp Authentication) क्रमांक द्यावा लागणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे.१ तारखेपासून हा नियम लागू होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. मागील महिन्यात रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवे नियम जाहीर केले होते.

नव्या नियमानुसार आता ग्राहकांना तिकिट बुक करण्यासाठी ओटीपी टाकणे अनिवार्य असणार आहे जेणेकरून ही प्रकिया पारदर्शक होणार आहे. याशिवाय रेल्वे मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या प्रवासापूर्वी २४ तास आधी अंतिम प्रवाशांची यादी (Chart) बनवली जाऊ शकते या कल्पनेची तयारीही रेल्वेने सुरु केली आहे. याची सध्या चाचपणी सुरू आहे. सध्याच्या घडीला तिकिट कन्फर्म आहे का हे केवळ ४ तास प्रवासाआधी कळते. अनेक वेळा अशा प्रसंगी संभ्रमाची परिस्थिती होते त्यावर मात करण्यासाठीही रेल्वे प्रयत्नशील राहणार आहे.

१ जुलैपासून तत्काळ तिकिट नोंदणीसाठी आधार जोडलेल्या प्रवाश्यांना बुकिंग करण्यासाठी मोबाईल अँप व आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावर करता येणार आहे. आता १५ जुलै पासून प्रवाश्यांना तत्काळ तिकिटासाठी ओटीपी अनिवार्य (Mandatory) करण्यात आले आहे. तत्काळ तिकिट (Computerised Passenger Reservation System) काऊंटरवर व अधिकृत एजंटकडून ओटीपी माध्यमातून बुकिंग करता येईल.

याखेरीज कठीण प्रसंगी मोठ्या प्रमाणातील ग्रुप बुकिंग होऊ नये म्हणून रेल्वेने ऐनवेळी बुकिंग चालू झाल्यानंतर अधिकृत एजंटकडून पहिल्या ३० मिनिटांत तिकिट घेण्यास अथवा विकण्यास प्रतिबंध केला आहे. वातानुकूलित (AC Class) सा ठी सकाळी १० ते १०.३० पर्यंत व विना वातानुकूलित (Non AC) साठी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान हे प्रतिबंध लागू होणार आहेत‌. तिकीट विक्रीत पारदर्शकता आणण्यास रेल्वेने हा महत्वाकांक्षी उपक्रम चालू केला आहे.

तांत्रिकदृष्ट्या CRIS, IRCTC या रेल्वेच्या विभागाकडून सिस्टिम मध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जाऊ शकतात.
Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई