आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज​ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थाना​साठी सज्ज

  81

आळंदी : जगतगुरूश्री संत तुकाराम महाराज​ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यां​चा प्रस्थान​ सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. या अनुपम प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी पोलिस दल, प्रशासकीय यंत्रणांची सज्ज आहेत. आळंदी पोलिस ठाण्यानं यंदाच्या वारीत अधिकारी, कर्मचारी व विविध पोलिस पथके ​असं जवळपास २ हजार मनुष्यबळ​ तैनात केलयं. ​


​आषाढी वारीला सुरुवात झालीय. विठूरायाच्या भेटीची आस असलेले वारकरी ज्ञानबा-तुकाराम​चा गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं देहू आणि आळंदी इथं ​दाखल होताहेत. ​​बुधवारी ​ ​जगतगुरू​ श्री संत तुकाराम महारा​जांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे.


प्रस्थान सोहळा याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांच्या गर्दीनं देहूनगरी फुललीय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी​ आलेल्या वारकरी-भाविकां​साठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ​



देहू नगरपंचाय​तीनं मुख्य मंदिर व परिसर, इंद्रायणी घाट, वैकुंठस्थान मंदिर, पीएमपी बसस्टॉप, देहूतील मुख्य रस्ते, अनगडशहा बाबा दर्गा, पाण्याचे टँकर उपलब्ध असणारी ठिकाणे, उपचार केंद्र, पोलिस मदत केंद्र आदी ४२ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेत.​ यातून संपूर्ण पालखी सोहळ्यावर बारीक नजर ठेवण्यात येणारेय. तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पाल​खी प्रस्थान सोहळा होणार असल्यानं आळंदीमध्येही दिंड्या मोठ्या संख्येने दाखल होताहेत. प्रस्थान सोहळा कालावधीत २०​ जूनपर्यंत आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. ​यामुळं आजपासून​ शहरात वाहनांना प्रवेश बंदी ​घातली आहे.केवळ दिंड्यांच्या पासधारक वाहनांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यावर यंदा अतिपावसाचे सावट आहे.​ माउली मंदिर आणि संपूर्ण आळंदीचा ​प्रस्थान सोहळा हा इंद्रायणी नदी घाटाभोवती पार पडत असतो. या काळात इंद्रायणी नदी घाटावर अनेक वारकरी जमा होतात. प्रस्थान सोहळा अवघ्या​ दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. ​स​हा दिवसांपूर्वीच इंद्रायणीची पाणीपातळी चांगलीच वाढलीय. ​चार दिवसांपासून इंद्रायणी नदीपात्र परिसरात मावळपासून आळंदीपर्यंत ​पाऊस सुरू आहे.​ हवामान विभागानंही आगामी ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा दिलाय. त्यामु​ळं या सोहळ्यासाठी हवामानाचा अंदाज लावून नदीच्या पाणीपातळीचा विचार करत प्रशासनाला अधिक सतर्क रहाव​ं लागणार ​आहे.

Comments
Add Comment

बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक, विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते भिडले

बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

वाहतुकीचा वेग संथ झाल्याने अडचणी पुणे : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना मंडई, शनिपार, तुळशीबाग

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू

ST Employees Salary: बाप्पा पावले! एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळणार

मुंबई: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Atharv Sudame controversy: गणेशोत्सवापूर्वी व्हायरल झालेल्या 'त्या' रीलमुळे पुण्याचा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अडचणीत! मागितली माफी

पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या