अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण बेमुदत सुरू करणार, अशी जाहीर घोषणा करत त्यांनी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर मुंबईत उतरायचे आवाहन केले. आणखी दोन दिवस तुमच्या हातात आहेत, मराठी आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मराठी आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढा आणि त्याची अंमलबजावणी करा, त्याच्याशिवाय मी एकही मागणी मागे करणार नाही. मराठ्यांनी काम-धंदे बंद करा, आता मुंबईला जायची तयार करा, असा उठाव पुन्हा होणार नाही, एकजुटीचा असा सोहळा पुन्हा होणे नाही.

म्हणून या लढाईत मराठ्यांनी सहभागी व्हा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलाय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून सकाळी 10 वाजता निघणार, 27 तारखेला जुन्नरमध्ये शिवनेरीवर मुक्काम करणार, चाकण, खेड पुढे वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईत आंदोलनासाठी पोहोचणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. ४ महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईत आंदोलनात घोषणा केली होती. पण चार महिने सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही.

अंतरवालीत या असं फडणवीसांना सांगितलं होतं. फडणवीसांनी आडमुठेपणा करू नये असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. मुंबईत २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. जरांगेच्या चलो मुंबई आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
Comments
Add Comment

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी