'शक्य तितक्या लवकर तेहरान सोडा, भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा'

तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील लढाई तीव्र होत चालली आहे. यामुळे सुरक्षिततेसाठी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर तेहरानमधून बाहेर पडावे. इराण सोडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी इराण - आर्मेनिया सीमेवरुन आर्मेनियात प्रवेश करावा आणि इराणमधून बाहेर पडावे. इराणमध्ये असलेल्या तसेच इराण सोडत असलेल्या भारतीयांनी भारताच्या दूतावासाच्या संपर्कात राहावे; असे आवाहन भारत सरकारने केले आहे. भारताच्या इराणमधील दूतावासाने भारतीयांच्या सोयीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. +98 9010144557, +98 9015993320, +91 8086871709 या नंबरवर संपर्क साधा, असे आवाहन भारताच्या दूतावासाने इराणमधील भारतीयांना केले आहे. तसेच इस्रायलमध्ये असलेल्या भारतीयांना +91-11-23012113, +91-11-23014104, +91-11-23017905, +91-9968291988 या नंबरवर संपर्कात राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. इस्रायल आणि इराण दोन्ही ठिकाणी 24*7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


इराण नवनव्या अण्वस्त्रांची निर्मिती करत आहे. यामुळे आमच्या सुरक्षेला धोका आहे, असे सांगत इस्रायलने इराण विरोधात हवाई हल्ले सुरू केले. हल्ले करताना इस्रायलने इराणचे अण्वस्त्र निर्मिती प्रकल्प, क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प, अण्वस्त्र साठा, क्षेपणास्त्र साठा, सैन्य तळ, विमानतळ आणि लढाऊ विमानं, महत्त्वाचे सैन्याधिकारी आणि गुप्तचर अधिकारी यांना लक्ष्य केले. याउलट इराणने प्रत्युत्तर देताना अनेक क्षेपणास्त्र इस्रायलमधील नागरी वस्तीला लक्ष्य करुन डागली.


इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या सैन्य शक्तीचे आणि गुप्तचर यंत्रणेचे नुकसान झाले. याउलट इराणच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये जीवितहानी झाली. सैन्य शक्तीचे इराणच्या तुलनेत कमी नुकसान झाले.

Comments
Add Comment

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प